नवी दिल्ली : आठवड्यात सलग तिसऱ्यांदा पेट्रोल डिझेल घ्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोल डिझेल चे भाव अजूनही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज शुक्रवारी पेट्रोल 84 पैसे तर डिझेल 85 पैशांनी महागले. आज सकाळी पासून देशात नवे दर लागू होणार आहेत.
मंगळवारीही पेट्रोल प्रतिलीटर 84 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर 83 पैशांनी वाढ करण्यात आली होती. तर बुधवारी पेट्रोल 84 तर डिझेल 83 पैसे प्रति लिटरने वाढ झाली होती.
दिल्लीत आज पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 97.81 रुपये प्रति लिटर आणि 89.07 रुपये प्रति लिटर (80 पैशांनी वाढले).
तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर 112.51 रुपये आणि 96.70 रुपये (अनुक्रमे 84 पैसे आणि 85 पैशांनी वाढले ) आहे. तसेच आगामी काळात पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारच्या निषेधार्थ दि. २८, २९ मार्चला कामगार संघटनांचा देशव्यापी संप – डॉ. कराड
ब्रेकिंग : आता राज्यभरात मराठीच कामकाज, राजभाषा विधेयक मंजूर !
पुणे : ११ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना