Friday, April 4, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Ebrahim raisi : इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

Ebrahim raisi : इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी (Ebrahim raisi) यांच्यासह नऊ जणांना घेऊन चालले हेलिकॉप्टर क्रैश झाले. सोमवारी (20 मे) सकाळी उत्तरेकडील प्रदेशात हा अपघात झाला.

---Advertisement---

हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी (Ebrahim raisi) आणि परराष्ट्र मंत्री होसेन अमीराब्दुल्लाहियान यांच्यासह नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. एका इराणी अधिकाऱ्याने याला दुजोरा दिला. त्यांनी वृत्तसंस्था रॉयटर्सला सांगितले की, राष्ट्रपती, परराष्ट्र मंत्री आणि हेलिकॉप्टरमधील सर्व प्रवाशांचा अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांच्या हेलिकॉप्टरचा अवशेष अझरबैजानच्या टेकड्यांमध्ये सापडला होता. त्यात राष्ट्रपती रईसी यांच्यासह 9 जण होते.

रविवारी संध्याकाळी 7.00 वाजण्याच्या सुमारास अझरबैजानजवळ हेलिकॉप्टर बेपत्ता झाले. रात्रभर त्याचा शोध सुरू होता. परिसरात जोरदार पाऊस, धुके आणि थंडीमुळे शोधकार्यात अडचणी येत होत्या. यादरम्यान तीन बचाव कर्मचारीही बेपत्ता झाले.

---Advertisement---

राष्ट्रपती रईसी आणि परराष्ट्र मंत्री होसेन यांच्याशिवाय, हेलिकॉप्टरमध्ये पूर्व अझरबैजान प्रांताचे गव्हर्नर मलिक रहमाती, तबरीझचे इमाम मोहम्मद अली अलीहाशेम, एक पायलट, सहवैमानिक, क्रू प्रमुख, सुरक्षा प्रमुख आणि अंगरक्षक होते.

Ebrahim raisi यांच्या निधनाबद्दल मोदींकडून शोक व्यक्त

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत ट्विट केले की, ‘इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ. सय्यद इब्राहिम रईसी यांच्या निधनाने अतिशय दु:ख आणि धक्का बसला आहे. भारत-इराण द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यात त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांचे कुटुंब आणि इराणच्या लोकांप्रती माझ्या संवेदना. या दु:खाच्या काळात भारत इराणच्या पाठीशी उभा आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई

२० दिंडोरी, २१ नाशिक लोकसभा मतदारसंघांसाठी आज मतदान

ब्रेकिंग : 10th, 12th बारावीचा निकालाबाबत मोठी अपडेट

पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत? वाचा काय म्हणाले मोदी !

25 दिवसांनंतर बेपत्ता अभिनेता घरी, अभिनेत्याने केला मोठा खुलासा

तुम्ही RSS सुद्धा नष्ट करायला निघाले उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

ब्रेकिंग : सोन्याच्या किंमतीत विक्रमी वाढ, चांदीचाही विक्रम

ब्रेकिंग : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे RSS बद्दल मोठे विधान

पुण्यात विकृतीचा कळस ! पत्नीच्या गुप्तांगला लावले कुलूप

---Advertisement---

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या एप्रिल महिन्यातील मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles