Wednesday, February 5, 2025

प्रबोधनामुळे ग्रामीण भागात लसीकरणाला चांगला प्रतिसाद, सांदण आदिवासी लोकचळवळीकडून लसीकरणासाठी जनजागृती

राजूर (अकोले) : अकोले तालुक्यातील ग्रामीण भागात चुकीच्या समजुतीमुळे अनेक लोक कोरोना चाचण्या व लसीकरणापासून दूर होते. मनातील भीती व चुकीचे समज यामुळे ग्रामीण भागातील लोक लसीकरणाला प्रतिसाद देत नव्हते. मागील महिन्यात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र खडकी खु. येथे प्रथम लसीकरणाच्या वेळी अत्यल्प प्रतिसाद दिसून आल्यामुळे काही लसी पुन्हा माघारी पाठविण्यात आलेल्या होत्या. 

ग्रामीण भागातील या प्रतिसादामुळे आरोग्य विभागात समोर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. अशावेळी मवेशी येथील आरोग्य सेविका एस.जी. सारोक्‍ते यांच्या मार्गदर्शनाखाली सांदण आदिवासी लोकचळवळीच्या माध्यमातून गावात लसीकरणा विषयी चे गैरसमज दूर करत जनजागृती करण्यात आली. या जनजागृतीचा परिणाम म्हणून यावेळी खडकी येथील आरोग्य उपकेंद्रात लसीकरणासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी यावेळेस निसंकोचपणे लसीकरण करून घेतले. 

लसीकरणाच्या वेळी आरोग्यसेविका एस. जी. सारोक्‍ते, गोपाळा कवटे, नंदा कोंढावळे, बुधाबाई भांगरे यांनी व्यवस्था पाहिली. यावेळी उपकेंद्रावर सांदण आदिवासी लोकचळवळीचे अरविंद सगभोर, किरण बांडे, दीपक भांगरे, भारत बांडे, विठ्ठल भालचीम यांनी महत्वाचे योगदान दिले. यावेळी सचिव किरण बांडे यांनी लसीकरणासाठी खेड्यापाड्यात प्रबोधन करणार असल्याचे सांगितले.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles