पुणे : पुण्यातून एक मोठी खळबळजनक बातमी समोर आली आहे. अमरावती पोलीस दलात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने पत्नीसह पुतण्याची गोळी झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. भरत गायकवाड असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
भरत गायकवाड हे अमरावती पोलीस दलात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते. पुण्यातील बाणेर, बालेवाडी भागात गायकवाड कुटुंब वास्तव्यास होते. सध्या सुट्टीवर असलेले भरत गायकवाड हे शनिवारीच पुण्यातील घरी आले होते. पहाटे सव्वातीन वाजताच्या सुमारास त्यांनी आधी पत्नी मोनी गायकवाड (वय ४४) आणि नंतर पुतण्या दीपक गायकवाड (वय ३५) यांची गोळी झाडून हत्या केली. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.
भरत गायकवाड यांनी दोघांना गोळ्या घालून हत्या केल्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून घेत आत्महत्या केली. ही घटना घडली तेव्हा भरत गायकवाड यांची आई आणि दोन मुलेही घरात होती. या घटनेमागील कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिस सध्या या घटनेचा कसून तपास करत आहेत.
हे ही वाचा :
रत्नागिरी येथे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत भरती; आजच करा अर्ज
कराड येथे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती
PCM : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज !
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1876 जागांसाठी नवीन भरती; आजच करा अर्ज!
सांगली येथे महापारेषण अंतर्गत भरती; 3 ऑगस्ट 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख
पिंपरी चिंचवड सायन्स पार्क अंतर्गत भरती; 31 जुलै 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख