Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

पिंपरी डेअरी फार्म उड्डाणपुलाचे काम सुरू होणार – संजोग वाघेरे‌

सातत्याने सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश

---Advertisement---

पिंपरी चिंचवड : पिंपरीगावातील मिलिटरी डेअरी फार्म रेल्वे फाटकाजवळ नव्याने विकसीत होणाऱ्या उड्डाणपूलाची निविदा आज, शनिवार दिनांक १६ जुलै २०२२ रोजी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमार्फत प्रसिद्ध करण्यात आली. निविदाप्रक्रिया पूर्ण होऊन‌ लवकरच या उड्डाणपुलाचे काम सुरू होणार आहे. या उड्डाणपुलामुळे पिंपरी वाघेरे गाव‌ आणि पिंपरी कॅम्पातील‌ वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

या संदर्भात माजी महापौर संजोग वाघेरे‌ म्हणाले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थापत्य अभियांत्रिकी प्रकल्प ‌विभागामार्फत ही निविदा काढण्यात आली आहे.‌यामध्ये रेल्वे ओवर ब्रिज,डिझाईन, कंस्ट्रक्शन, तसेच जोडलेल्या रस्त्याचा सरासरी खर्च एकूण ५७, ५७,३०,५७७ रुपये आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक, तसेच पिंपरी कॅम्प आणि पिंपरी वाघेरे गावासाठी डेअरी फार्म उड्डाणपूल महत्वाचा प्रश्न होता. महानगरपालिकेच्या माध्यमातून आवश्यक ठराव‌ वेळोवेळी मंजूर करून घेतल्यामुळे, तसेच सर्व संबंधित शासकीय कार्यालयात, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या पातळीवर सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे पिंपरी मिलेट्री डेअरी फार्म रेल्वे उड्डाणपूलाचे काम मार्गी लागले आहे. या प्रयत्नांना यश आले असून महानगरपालिकेच्या माध्यमातून डेअरी फार्म उड्डाणपुलाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता लवकरच प्रत्यक्ष कामास सुरूवात होईल. याचा उड्डाणपुलाचा या परिसरातील वाहतुकीची समस्या कायमची काढण्यास मदत होणार आहे. तसेच हा उड्डाणपुल निश्चित पिंपरी चिंचवड शहरासाठी फायदेशीर ठरणार आहे.

---Advertisement---

या बाबत संजोग वाघेरे म्हणाले की, या उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लागावा याकरिता तत्कालीन‌ नगरसेवक आणि पदाधिकारी रंगनाथ कुदळे, हरेश आसवानी, हनुमंत नेवाळे, दत्ता वाघेरे, नगरसेविका उषाताई संजोग वाघेरे, प्रभाकर वाघेरे, माधुरी मुलचंदाणी, सुनिता वाघेरे, गिरिजा कुदळे या सर्वांनी देखील वेळोवेळी प्रयत्न केले होते. तसेच खा. शरद पवार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळोवेळी रेल्वे विभाग व संरक्षण विभागा समवेत मिटिंग करून उड्डाणपूल व्हावा यासाठी संयुक्त प्रयत्न केले होते.

संपादन – क्रांतिकुमार कडुलकर

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles