Saturday, April 20, 2024
Homeविशेष लेख‘तापमानवाढीचे महासंकट रोखण्याची लोक-वैज्ञानिक दिशा’

‘तापमानवाढीचे महासंकट रोखण्याची लोक-वैज्ञानिक दिशा’

आतापर्यंतचा सर्वात तीव्र उन्हाळा व सर्वात लांबलेली मान्सून पावसाची सुरुवात हे आपण यंदा अनुभवले. जगभर ठिकठिकाणी अभूतपूर्व अशा तीव्र उष्णतेच्या लाटा आल्याच्या बातम्या आपण यंदा ऐकल्या. भारतात व जगात अनेक ठिकाणी सरासरी तापमान १ डिग्री ने वाढल्याचा हा परिणाम आहे.

अनियंत्रित, आंधळ्या औद्योगीकरणामुळे मानव-निर्मित कार्बन-डाय-ऑक्साइड (कर्बवायू) हवेत सोडणे जगभर प्रमाणाबाहेर वाढले आहे व त्यामुळे हे संकट ओढवले आहे. हे उत्सर्जन ताबडतोबीने घटवून ते २०३० पर्यंत निम्मे व २०५० पर्यंत शून्यावर आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले नाहीत तर जागतिक तापमान दीड-दोन डिग्रीने, कदाचित त्यापुढेही वाढून हवामानाची परिस्थिती हाताबाहेर जाईल असे संबंधित शास्त्रज्ञांनी वारंवार मांडले आहे. अती तीव्र उन्हाळा, अति-प्रचंड वादळे, अति-प्रचंड पाऊस, लांबलेले अवर्षणाचे दिवस, एकूणच हवामानाची व पावसाची वाढती अनिश्चितता यामुळे पुढील पिढ्यांवर महासंकटे कोसळून जगभर ठिकठिकाणी हाहाकार उडेल. त्यातून सामाजिक कलह वाढून, जागोजागी युद्धे पेटून आधुनिक मानवी संस्कृतीची जागा जंगलराज घेईल, या धोक्याकडे तज्ञ लक्ष वेधत आले आहेत.

‘तापमानवाढीचे महासंकट रोखण्याची लोक-वैज्ञानिक दिशा’ या लोकविज्ञान संघटनेच्या पुस्तिकेची सुरुवात होते हा धोका व त्यामागील कारणे थोडक्यात मांडून. त्या नंतर आहेत – हा धोका टाळण्यासाठी कोणते लोकवैज्ञानिक उपाय योजता येतील याची थोडक्यात ठोसपणे तोंडओळख करून देणारे अतुल देऊळगावकर, अच्युत गोडबोले, प्रियदर्शिनी कर्वे, संजय मं गो. प्राची शेवगावकर, गिरीश सोहोनी, अमोल फडके इ. तज्ञांचे बारा बहुमूल्य लेख. लोकविज्ञान-दिनदर्शिका २०२२ सोबतची सह-पुस्तिका या स्वरूपात असलेल्या या पुस्तिकेच्या पहिल्या आवृत्तीचे जोरदार स्वागत झाले. महिनाभरात तब्बल १६००० प्रतींची विक्री झाली ! सोप्या भाषेत या तज्ञांनी या नवीन, अतिशय महत्वाच्या विषया बाबत थोडक्यात केलेल्या मांडणीची खूप वाखाणणी झाली.

या विषयाचे महत्व व या पुस्तिकेचे झालेले स्वागत बघता दुसरी आवृत्ती प्रसिद्ध केली जात आहे. पहिल्या आवृत्तीतील हे वरील १२ लेख असलेल्या या दुस-या, लहान, ४० पानी पुस्तिकेची किंमत फक्त २५ रुपये आहे. दहा किंवा त्यापेक्षा जादा प्रति घेणा-यांना २५% सवलत आहे. शिवाय पार्सलचा खर्च लोकविज्ञान संघटनेचा. या पुस्तिकेच्या विक्रीसाठी कृपया आधी ऑर्डर नोंदवून सहकार्य करावे ही विनंती.


संपर्क – अविनाश हावळ

सेक्रेटरी लोकविज्ञान संघटना

फोन – 9822268058

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय