Saturday, May 10, 2025
---Advertisement---
---Advertisement---

पिंपरी चिंचवड : ‘त्या’ मुलीने निराधार केंद्रात केला वाढदिवस साजरा !

---Advertisement---

---Advertisement---

पिंपरी चिंचवड : भोसरी येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी ऋतुजा बोऱ्हाडे हिने आपला वाढदिवस सावली निवारा केंद्र, पिंपरी येथील निराधार वृद्धांना फळे, मिठाई आणि 5000 रुपये ची आर्थिक मदत  देऊन साजरा केला.

पुण्याच्या मॉडर्न महाविद्यालयात अनिमेशन आर्ट चे शिक्षण घेणाऱ्या ऋतुजाचे वडील रविंद्र बो-हाडे  पिंपरी चिंचवड मनपामध्ये उपलेखापाल आहेत.

ब्रेकिंग : बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

 

रशिया युक्रेनच्या युध्दासंदर्भात भारतातील काही मीडियाकडून फेक व्हिडिओचा वापर, अल्ट न्यूजने केला पर्दाफाश

ऋतुजा बो-हाडे म्हणाली की, “सावली निवारा केंद्रामधील निराधारांच्या जीवनात माझ्या वाढदिवसाचा आनंद दिसावा, वाढदिवसाचा खर्च सत्कारणी लागावा यासाठी मी फळे, गोड पदार्थ आणि 5000 रु रोख रक्कम दिली आहे. तरुणाईने  गरिबांसाठी थोडासा दिलासा दिला तर मानवतेची सेवा करता येईल.”

पिंपरी चिंचवड मनपाच्या नागरवस्ती विभागामार्फत शहरातील बेघर निराधार लोकांना या केंद्रात आसरा दिला जातो. रिअल लाईफ रिअल पीपल  स्वयंसेवी संस्था केंद्राचे संचालन करते. येथे 55 महिला पुरुष लाभार्थी आहेत. रिअल लाईफ रिअल पीपल चे गौतम थोरात, मिलिंद माळी, सचिन बोधनकर, अग्निस फ्रान्सिस यावेळी उपस्थित होते.

– क्रांतिकुमार कडुलकर

व्हाट्सअॅपवरील आक्षेपार्ह मेसेजच्या अ‍ॅडमिनच्या जबाबदारीबाबत न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

---Advertisement---

12 वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! 5000 पदांसाठी मेगा भरती

जगातील 30 सर्वात सुंदर पर्यटन स्थळांची यादी जाहीर, महाराष्ट्रातील “या” पर्यटन स्थळांचा समावेश

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles