जुन्नर : लग्न सोहळ्यात झालेल्या वादातून पुणे जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे व पांडुरंग लांडे (दोघेही रा. केवाडी, ता. जुन्नर) यांनी एकमेकांविरोधात जुन्नर पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत. दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली.
सविस्तर वृत्त असे की, हिवरेपठार (ता. जुन्नर) येथे देवराम लांडे व पांडुरंग लांडे हे नातेवाईकांच्या लग्न समारंभात गेले होते. त्यावेळी ही घटना घडली.
पुणे : जुन्नरला सातवाहन कालीन मातीच्या भांड्याचे अवशेष आढळले
पांडुरंग लांडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, “तु इथे कशाला आला, तुझे लग्न पत्रिकेत नाव नाही.” त्यानंतर पांडुरंग लांडे यांनी माझे नातेवाईक असल्यामुळे लग्नाला आलो आहे. त्यानंतर देवराम लांडे यांनी मोठ्या मोठ्याने शिवीगाळ करून दमदाटी करत तुझी वारकरी भजनी संघटना माझे काय वाकडे करणार असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली.”
तर देवराम लांडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, “पांडुरंग लांडे हे मंगल अष्टके म्हणण्यासाठी आले होते, त्यांना कोठेतरी बाहेर दुसऱ्या ठिकाणी जायचे होते. म्हणून ते लोकांना कार्यक्रम लवकर उरकून घ्या मला पुढे जायचे आहे, असे बोलून शिवीगाळ करू लागले. तेव्हा देवराम लांडे हे पांडुरंग लांडे यांना समजावून सांगत होते की थोडावेळ थांबा आमची भावकी येऊ द्या, मग लग्न लावु असे बोलत असताना फिर्यादीस व लोकांना शिवीगाळ करून मी वारकरी संघटनेचा लिडर आहे. तुम्हाला पाहून घेत, अशी धमकी दिली.”
इंडिया सिक्योरिटी प्रेस नाशिक मध्ये विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !
नगरपालिका निवडणुकांचा बिगुल; जुन्नरमध्ये प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर
तर ५ लाख किलोचे स्पेस स्टेशन चीन किंवा भारतावर पाडायचे का? रशियाचा अमेरिकेला इशारा