Saturday, October 5, 2024
Homeआंतरराष्ट्रीयरशियावर झाला सायबर हल्ला ! युक्रेनच्या अज्ञात हॅकर्सची कामगिरी

रशियावर झाला सायबर हल्ला ! युक्रेनच्या अज्ञात हॅकर्सची कामगिरी

युक्रेन : रशिया आणि युक्रेनचे युद्ध वेगळ्या पातळीवरून लढण्यासाठी आता अज्ञात हॅकर्सच्या टीमने रशियाच्या महत्त्वाच्या वेबसाईटवर जसे की संरक्षण खात्यातील वेबसाईट सरकारी वेबसाईट आणि इतर महत्त्वाच्या रशियाच्या वेबसाईटवर अज्ञात हॅकर्स ने हल्ला केला आहे. त्यांच्या मते रशियाने केलेला नरसंहार थांबवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कालपासून दिवसभर या सर्व वेबसाईट स्लो होत्या तर काही बंद पडल्या.

असाच सायबर हल्ला 2008 साली अमेरिकेवर केला गेला होता. त्यातून अमेरिकेला पुन्हा वर येण्यासाठी बराच वेळ लागला. आता तीच गोष्ट रशियाच्या बाबतीत घडत आहे. सायबर हल्ला करणाऱ्या टीमचे असे म्हणणे आहे की, रशियाच्या सरकारी क्षेत्रात अडथळा आणणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे आणि येणाऱ्या काळात रशियाला खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे.

रशिया युक्रेनच्या युध्दासंदर्भात भारतातील काही मीडियाकडून फेक व्हिडिओचा वापर, अल्ट न्यूजने केला पर्दाफाश

युक्रेनच्या मदतीला सायबर हल्ला करणारी टीम धावून आली आहे. जगभरातील चीन वगळता जवळपास सगळ्या देशांचा युक्रेनला पाठिंबा आहे. मात्र, भारताने तटस्थ भूमिका घेतली आहे. हे युद्ध लवकर संपावे अशीच सर्वांची इच्छा आहे.

एका रशियन वृत्त संस्थेने, रशियाच्या काही बेवसाईट स्लो तर काही बंद झाल्याचे सांगितले आहे.

12 वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! 5000 पदांसाठी मेगा भरती

पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !

व्हाट्सअॅपवरील आक्षेपार्ह मेसेजच्या अ‍ॅडमिनच्या जबाबदारीबाबत न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

संबंधित लेख

लोकप्रिय