पिंपरी चिंचवड : सक्षम फाउंडेशन व असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टस पिंपरी चिंचवड यांच्यावतीने निगडी- ट्रान्सपोर्टनगरी येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यात स्थलातरीत कामगारांना एड्सबद्दल माहिती देऊन, जनजागृती करण्यात आली. ७५ जणांनी शिबिराचा लाभ घेतला. यामध्ये सक्षम फाउंडेशनमार्फत (Saksham Foundation) या परजिल्ह्यातील आणि स्थलांतरीत कामगारांची एचआयव्ही तपासणी करून औषध पुरवठा करण्यात आला. यावेळी कामगारांना फाउंडेशनच्या प्रकल्प व्यवस्थापक स्नेहल माहुलकर यांनी एड्सबद्दल माहिती देऊन जनजागृती केली. (AIDS Awareness Camp)
मोठी बातमी : राज्यात नवे निर्बंध लागू
सक्षम फाउंडेशन व असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टस पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने निगडी- ट्रान्सपोर्टनगरी येथे आयोजित आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
त्यावेळी स्नेहल माहुलकर म्हणाल्या, ‘‘एचआयव्ही चाचणी व उपचार यांच्यातील दरी दूर करण्यासाठी असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टसच्या मदतीने स्थलारीत कामगार व मालक यांच्या युनियन यांना सोबत घेऊन एक मोहीम राबवित आहोत.’’
शिबिरामध्ये तालेरा रुग्णालयाचे आयसीटीसी प्रयोगशाळा तंत्रज्ञ अनिता बुरूडे, प्रकल्प समुपदेशक वृषाली महाकाळ, आरोग्य सेवक पूजा माने, सुनील मोकल यांनी रुग्णांची तपासणी केली. शिबिरासाठी फाउंडेशनचे संचालक अमर कदम यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
हेही वाचा ! महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) विविध पदांच्या एकूण ५४७ जागा
यावेळी असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टसचे अध्यक्ष प्रमोद भावसार, उपाध्यक्ष सुमीत धुमाळ, सचिव अनुज जैन, सदस्य सतनाम सिंह पन्नू, मंजीतसिंह संधू, सुरेशकुमर नेहरा, रमेश चौधरी उपस्थित होते.
– क्रांतिकुमार कडुलकर