लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे पाणी बाणी – शिवसेना नेते हरेश नखाते यांचा आरोप
पिंपरी चिंचवड : काळेवाडीतील पाणी टंचाईमुळे नागरिक हैराण झाले असून 2019 पासून परिसरामध्ये पाणी पुरवठा व्यवस्थापन बिघडले आहे असा आरोप शिवसेना नेते हरेश नखाते यांनी केला.
मनपाच्या क्षेत्रीय जनसंवाद सभे दरम्यान मनपा ब प्रभाग कार्यालय, चिंचवड येथे शिवसेना उपशहर प्रमुख हरेश नखाते व सुजाता हरेश नखाते यांनी आंदोलन केले. त्यावेळी त्यांनी मागणी केली की, सुमारे 50 हजार लोकवस्ती असलेल्या काळेवाडी परिसरामध्ये 2019 पासून पाणी पुरवठा व्यवस्थापन बिघडले आहे. येथे निर्धारित वेळेप्रमाणे पाणी पुरवठा होत नाही. गैर व्यवस्थापन आणि लोकप्रतिनिधींच्या नाकर्ते पणामुळे येथे कृत्रिम पाणी टंचाई आहे. याचा निषेध करणारा बॅनर नखाते यांनी अंगात परिधान केला होता. कधी दुपारी अडीच वाजता तर कधी रात्री अडीच वाजता पाणी येते पाण्याचे प्रेशर कमी असते आणि अवेळी होत असलेल्या पाणी पूरावठ्यामुळे महिला वर्गाला अतिशय मनस्ताप होत आहे, असे ते म्हणाले.
ब्रेकिंग : पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका, सलग सातव्यांदा वाढ
पहाटेला आणि सायंकाळी प्रेशरने किमान तीन तास पाणी पुरवठा केला तर नागरिक आणि महिलांचा मनस्ताप दूर होईल, असे हरेश नखाते यांनी प्रशासन अधिकाऱ्यांना सांगितले. या उन्हाळ्यात पाणी पुरवठा वेळेत करा अशी मागणी त्यांनी केली. यावेळी सुजाता हरेश नखाते, शिवसेना विभाग प्रमुख गोरख पाटील, प्रदीप दळवी, अंकुश कोळेकर, विकास काजवे हे पदाधिकारी उपस्थित होते.
-क्रांतिकुमार कडुलकर
देशव्यापी संपानिमित्त पुण्यात कामगारांचे जोरदार आंदोलन, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा लक्षणीय सहभाग !
२ दिवस संपूर्ण अंगणवाड्या बंद ठेऊन संप यशस्वी !