Saturday, April 5, 2025
---Advertisement---
---Advertisement---

शहराचे नाव बदलून जिजाऊ नगर करण्यासाठी लोकचळवळ उभारणार – महेश बारणे

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि.१७ – इतिहास ज्यांनी पुसला त्यांच्या भाषेच्या आद्याक्षरांनी आमच्या शहराची ओळख नको… इतिहास घडवला ज्यांनी ते नाव आम्हाला प्राणाहून प्रिय आहे. आता पीसीएमसी (PCMC) नकोच जिजाऊनगरच हवे अशा आशयाचे शहरात मोठे फ्लेक्स बोर्ड लावून पिंपरी चिंचवड शहराचे नाव बदलून जिजाऊ नगर करण्यासाठी भक्ती शक्ती प्रतिष्ठानच्या वतीने जनजागृती करण्यात आली आहे.

राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना भक्ती शक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश हिरामण बारणे यांनी या फ्लेक्स द्वारे अभिवादन केले आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहराचे नाव बदलून जिजाऊ नगर करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या चळवळीत ९०११५ ६१८१८ या फोन नंबरवर मिस्ड कॉल देवून नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. यापूर्वी देखील ही मागणी करणारे फलक शहरात सर्वत्र लावून जनजागृती करण्यात आली होती. आता यासाठी लोकचळवळ उभी करणार असल्याचे महेश हिरामण बारणे यांनी सांगितले आहे.


निरर्थक अट्टहास हवा की इतिहास हवा ? ओळख नसलेली आद्याक्षरे हवीत की जिने महाराष्ट्राला शिवराय दिले त्या मातेचे नाव हवे ? तसेच कोण पण उठतं आणि म्हणतं नावात काय ? उच्चारून तर बघ… जय जिजाऊ ! जय शिवराय !! मग कळेल आम्ही का म्हणतो.. आता पीसीएमसी नकोच ,अशी भावनिक साद घालणारे फलक शहरात सर्वत्र लावण्यात आले आहेत. यावरील मजकूर वाचून त्यांचे फोटो काढून नागरिक एकमेकांना सोशल मीडिया वर सेंड करून संबंधित फोनवर मिस्ड कॉल देवून सहभागी होत आहेत. लवकरच याचे भक्ती शक्ती प्रतिष्ठानच्या वतीने दस्तऐवज तयार करून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सह महाराष्ट्रातील सर्व खासदार, आमदार यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे महेश हिरामण बारणे यांनी सांगितले आहे.

विशेष लेख : असंघटित कष्टकरी, कंत्राटी कामगारांची ‘गधा मजदूरी’ म्हणजे मालकवर्गाचे नफ्याचे अर्थशास्त्र

आळंदीत मोफत आरोग्य तपासणी औषध वाटप

भोसरीतील ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाला मुदतवाढ, पिंपरी-चिंचवडच्या तहसीलदार डॉ. अर्चना निकम यांचे आवाहन

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles