Wednesday, June 26, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : भोसरी विधानसभा मतदारसंघात, विकासकामांचा ‘सुपर संडे’

PCMC : भोसरी विधानसभा मतदारसंघात, विकासकामांचा ‘सुपर संडे’

तळवडे, चऱ्होली अन्‌ दिघीतील प्रस्तावित कामे मार्गी
– आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते ६ ठिकाणी भूमिपूजन

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : सोसायटी, कॉलनीमधील अंतर्गत रस्ते, सभांडप आणि मंदिर सुशोभिकरणाच्या कामासह विविध ६ विकासकामांना आमदार महेश लांडगे (Mahesh Landage) यांच्या पुढाकाराने चालना देण्यात आली. त्यामुळे प्रस्तावित विकासकामांसाठी भोसरीत ‘सुपर संडे’ ठरला, अशा भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. pcmc

भोसरी विधानसभा मतदार संघातील (Bhosari Assembly Constituency) तळवडे, चऱ्होली, मोशी आणि दिघी या भागातील विविध प्रस्तावित विकासकामांचे भूमिपूजन आमदार महेश लांडगे यांच्या ‘आमदार निधी’तून करण्यात आले. यावेळी स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ आणि नागरिक उपस्थित होते.

रुपीनगर तळवडे येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समाज मंदिर सभामंडप, शिवशक्ती हाउसिंग सोसायटी, सहयोगनगर येथील श्रीगणेश मंदिर आणि क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मरणार्थ चव्हाण वस्ती येथे सुशोभिकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच, दिघीतील श्रीराम कॉलनी, भारतमाता नगर, गणेश कॉलनी आणि डुडूळगाव येथील अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजनही करण्यात आले.

रुपीनगर, तळवडे येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समाज मंदिर सभा मंडपाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गजनन वाघमोडे, सचिव राजेंद्र सोनटक्के, माजी नगरसेवक शांताराम भालेकर, उपाध्यक्ष सुनिल बनसोडे, दत्ता करे, कार्याध्यक्ष शिवाजी बिरके, खजिनदार संजय रुपनवर, सहखजिनदार संजय मोगे, नाना गावडे, सचिन नायकुडे, दयानंद सोनटक्के, विनोद नवसे, रमेश हिवरे, विश्वास सुरवदे, रामेश्वर बुदडकर यांच्यासह स्थानिक नागरिक, ग्रामस्थ उपस्थित होते.(Bhoomipujan of various development works was done)

तसेच, सहयोगनगर- तळवडे येथे शिवशक्ती मित्र मंडळाच्या पुढाकाराने गणेश मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते निलेश भालेकर, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, पांडाभाऊ भालेकर, रमेश भालेकर, शांताराम दगडू भालेकर, शिरीष उत्तेकर, प्रतिष्ठानचे विलास पवार, बालाजी राठोड, दत्तात्रय माने, किरण कुंभार, शंकर जगताप, मोहम्मद सय्यद, योगेश गव्हाणे, रजनीकांत राठोड, नितीन चव्हाण, नंदकुमार बोत्रे, श्रीकांत धायगुडे, दादा गोरड आदी उपस्थित होते. pcmc

क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मरणार्थ समाज मंदिर

तळवडे येथे क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मरणार्थ चव्हाण वस्ती, तळवडे गावठाण येथे सुसज्ज समाज मंदिर उभारण्यात आले आहे. त्याच्या सुशोभिकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक शांतराम भालेकर, सुरेश तात्या म्हेत्रे, धनंजय वर्णेकर, अस्मिता भालेकर, सोमनाथ मेमाणे, दत्तात्रय चव्हाण, किसन चव्हाण, बबन चव्हाण, सागर चव्हाण, कैलास चव्हाण, निलेश चव्हाण, आप्पा कांबळे, शिवाजी चव्हाण आदी उपस्थित होते.

दिघीतील दोन रस्त्यांची कामे मार्गी

दिघी येथे गजानन महाराज नगरमधील श्रीराम कॉलनी क्रमांक १ तसेच, भारतमाता नगर गणेश कॉलनी नं. २ मध्ये प्रस्तावित रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी माजी उपमहापौर हिरानानी घुले, माजी नगरसेवक विकास डोळस, माजी शिक्षण समिती सभापती चेतन घुले, उदय गायकवाड, कुलदीप परांडे, मनोज गायकवाड, इंद्रजीत भोसले, संदीप कणसे, श्री. गुजर यांच्यासह परिसरातील माता-भगिनी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

चऱ्होलीमध्ये नवीन जलवाहिनी

भोसरी विधानसभा मतदार संघातील चऱ्होली येथे लक्ष्मीनारायण नगर येथील नागरिकांच्या मागणीनुसार नवीन जलवाहिनीचे काम सुरू करण्यात आले. यामुळे आगामी काळात पाणी पुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन तापकीर, माजी नगरसेविका सुवर्णा बुर्डे, स्वीकृत नगरसेवक अजित बोर्डे, भाऊ रासकर, सुनील काटे, गणेश तापकीर, कस्तुभ तापकीर,बाळासाहेब काटे, विनायक तापकीर, सोमनाथ घारे, सुनील शिंदे, अंकुश निवळकर, सुखदेव मोहिते, अंकुश चिकणे, देविदास साबळे, मुकुंद शेळके, गणेश माने, सागर चव्हाण, अमोल जाधव, संतोष गवते, श्री. वाणी यांच्यासह परिसरातील नागरिक, ग्रामस्थ उपस्थित होते. pcmc news

प्रतिक्रिया:

अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्यादेवी होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांच्या नावाने होणारा सभामंडप हा अहिल्यादेवी होळकरांच्या विचारांची कायम साक्ष देत राहील, असा विश्वास वाटतो. यासह सर्वसमावेशक विकासकामे मार्गी लावण्यात आली आहे. मतदार संघातील नागरिकांना पायाभूत सोयी-सुविधा सक्षमपणे देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.

महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

धक्कादायक : पुरलेल्या बाळाचा मृतदेह गायब, सोलापुरातील मोदी स्मशानभूमीतील घटना

ब्रेकिंग : EVM हॅक झाल्याच्या चर्चांवर निवडणूक आयोगाने दिली महत्वाची माहिती

ब्रेकिंग : ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर अंतर्गत 140 पदांसाठी भरती

ब्रेकिंग : 400 पार झालो असतो तर भारत हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं भाजप नेत्याच्या विधानाने खळबळ

मोठी बातमी : EVM मशीन AI द्वारे हॅक होऊ शकते इलॉन मस्क यांच्या दाव्याने खळबळ

ब्रेकिंग : महाविकास आघाडीचा मोठा निर्णय, भाजपची डोकेदुखी वाढली

PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती

ब्रेकिंग : भारतीय तटरक्षक दलात 320 पदांची मोठी भरती

NFL : नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत 164 पदांची भरती

ब्रेकिंग : अग्निवीर योजनेबाबत केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी सरकार ऍक्शन मोड मध्ये

सिक्किममध्ये तिस्ता नदीचा कहर, अनेक भाग पाण्याखाली; 1500 पर्यटक अडकले!

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय