पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : मुंबईतील घाटकोपर येथील होर्डिंग (Hoarding)
कोसळल्याच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील होर्डिंगचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडीट (Structural audit) करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी यांनी मनपा प्रशासनास दिले आहेत.
स्थापत्यविषयक लेखापरीक्षण न केलेले तसेच अनधिकृत सर्व जाहिरात फलक (Hoardings) काढून टाकावेत, तसेच अनधिकृत जाहिरात फलकांवर कठोर कारवाई करावी. त्यामध्ये प्रामुख्याने धोकादायक, वाहतुकीस अडथळा ठरणार्या जाहिरात फलकांवर तातडीने कारवाई करावी. या कामकाजावर दैनंदिन नियंत्रण ठेवून संबंधित अधिकार्यांमार्फत नव्याने स्थापत्यविषयक लेखापरीक्षण तातडीने करावे, असे सक्त आदेश जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत. pcmc news
जिल्हाधिकारी पुणे (Suhas Divase) यांनी नव्याने स्ट्रक्चरल ऑडीट केल्याचे प्रमाणित दाखले सादर करावेत. यापूर्वी स्ट्रक्चरल ऑडीट न केलेल्या होर्डिंग धारकांना नोटीस देऊन त्यांच्यावर काय कारवाई करण्यात आली, याचा देखील अहवाल जिल्हाधिकारी यांनी मागवून घेतला आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन (PCMC) पुढील 15 दिवसात होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडीट तातडीने करणार आहे. PCMC NEWS
पिंपरी-चिंचवड शहरात 1200 अधिकृत होर्डिंग आहेत. या होर्डिंगचे पुन्हा स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाने होर्डिंग चालक, मालकांची बैठक घेऊन स्ट्रक्चरल ऑडिटचा दाखला घेतला. शहरात 31 मार्च 2024 अखेर 1 हजार 136 अधिकृत होर्डिंग होते. त्यानंतर परवाना विभागाने नव्याने 60 होर्डिंगला परवानगी दिली. त्यामुळे शहरात एकूण 1 हजार 196 अधिकृत होर्डिंग (Hoardings)सद्यस्थितीत आहेत.
पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी ते दापोडी या मार्गाच्या दोन्ही बाजूला 35 मोठ-मोठे होर्डिंग आहेत. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. याच मार्गावरून पंढरपुरकडे जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांचा पायी पालखी सोहळा दरवर्षी मार्गस्थ होत असतो. यंदा जूनअखेर पालखी सोहळा मार्गस्थ होणार आहे. पालखी सोहळ्यात लाखो भाविक सहभागी होत असतात. त्यामुळे या मार्गावर एखादी दुर्घटना होण्यापूर्वीच धोकादायक होर्डिंग काढण्याची मागणी होत आहे. pcmc
शहरातील सर्व होर्डिंग मजबूत असल्याची खातरजमा केली जाणार आहे. कमकुवत असेल तर ते त्वरित हटविण्यात यावे, अशा सूचना पालिकेने एप्रिल महिन्यातच दिल्या होत्या. वादळ, वारा किंवा जोरदार पावसाने सांगाडा पडून जीवित किंवा वित्तहानी झाल्यास संबंधित सांगाडा धारकांनाच जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा पालिकेने यापूर्वीच दिला आहे. PCMC