Tuesday, July 2, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : इंद्रायणी परिसरात मद्य विक्री थांबवा; तीर्थक्षेत्री पावित्र्य राखा : बाबा...

PCMC : इंद्रायणी परिसरात मद्य विक्री थांबवा; तीर्थक्षेत्री पावित्र्य राखा : बाबा कांबळे

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री यांना बाबा कांबळे यांची पत्राद्वारे मागणी PCMC

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीला सध्या प्रदूषणाने घेरले आहे. नदीकाठ परिसरात हातभट्टी, मद्यविक्री करणाऱ्यांकडून त्यामध्ये अधिक भर घातली जात आहे. मद्यासाठी लागणारे दूषित पाणी नदीमध्ये सोडले जात आहे. त्यामुळे पाण्याला दुर्गंधी येऊन फेस येत आहे. असा व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करून हे व्यवसाय थांबवून संत भूमीचे पवित्र राखावे, अशी मागणी कष्टकरी कामगार पंचायतचे अध्यक्ष, कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी केली आहे. pcmc

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना याबाबत निवेदन दिले आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत आदींना पत्राद्वारे ही मागणी केली आहे. याबाबत ठोस कारवाई न झाल्यास अधिवेशन काळात वारकऱ्यांसह विधान भवनावर आंदोलन करण्याचा इशाराही बाबा कांबळे यांनी दिला.

बाबा कांबळे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, राज्यभरातील लाखो वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी आषाढी वारी मध्ये सहभागी होतात. श्री क्षेत्र देहू आणि श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी राज्यभरातून वारकरी दाखल होतात. ज्ञानोबा माऊली आणि संत तुकोबा महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होतात. तमाम वारकऱ्यांसाठी हा आनंदाचा क्षण असतो. पालखी सोहळ्यात सहभागी होण्याबरोबरच वारकऱ्यांची इंद्रायणी नदी बरोबर देखील भावनिक आस्था आहे.

नदी मध्ये तीर्थस्थान, तीर्थ प्राशन केल्यानंतर आपण धन्य झालो, अशी भावना वारकऱ्यांमध्ये असते. मात्र यंदाच्या वारीमध्ये वारकऱ्यांमध्ये नाराजी पसरण्याची शक्यता आहे. त्याला कारण इंद्रायणी नदी प्रदूषण हे ठरत आहे.

तीर्थक्षेत्र आळंदी देवाची येथील इंद्रायणी नदी परिसरामध्ये दारू माफियांकडून हातभट्टी, मद्य विक्री केली जात आहे.

त्यांच्याकडून टाकाऊ पदार्थ नदीत फेकले जात आहे. त्यामुळे नदी प्रदूषणात अधिक भर पडत आहे. नदी काठ परिसरात असणाऱ्या रासायनिक कंपन्या हे नदी प्रदूषणासाठी कारण ठरत असले. तरी मध्य विक्री करणारे देखील तेवढेच जबाबदार आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे नदी प्रदूषणात आणखीन वाढ करण्यासारखे आहे. अशी मद्य विक्री करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने योग्य जरब बसवणे गरजेचे असल्याचे बाबा कांबळे म्हणाले. pcmc

यापूर्वी संघटनेच्या वतीने सातत्याने अर्ज, निवेदने दिले आहेत. त्यावेळी कारवाई देखील करण्यात आली. मात्र मद्य विक्री करणारे निर्ढावलेले असून त्यांनी पुन्हा आपला व्यवसाय जोमाने सुरू केला आहे. त्यांच्यावर पोलिसी खाकी दाखवत कडक कारवाई करावी. हातभट्टी, मद्य विक्रीचे अड्डे उध्वस्त करून इंद्रायणी नदीसह आळंदी आणि देहू या संत भूमीचे पावित्र्य जपावे, अशी मागणी बाबा कांबळे यांनी केली.

याबाबत लवकर ठोस निर्णय न झाल्यास येत्या अधिवेशनात हजारो वारकऱ्यांसह, संघटनेचे पदाधिकारी विधानभवन परिसरात धडकतील. आंदोलन करतील असा इशारा बाबा कांबळे यांनी दिला.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : दिल्ली विमानतळावर भीषण अपघात, विमानतळाच्या पार्किंगचे छत कोसळले

मोठी बातमी : राज्याचा अर्थसंकल्प जाहीर, अर्थमंत्र्यांकडून अनेक घोषणांचा पाऊस

बेकायदेशीर पब-बार, अमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर मोठी कारवाई

अहमदनगर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत लिपिक पदाची मोठी भरती

मोठी बातमी : शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

विरोधी पक्षनेते राहुल गांधींना मिळणार अनेक अधिकार, मोदी सरकारची होणार अडचण !

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 17,727 जागांसाठी भरती सुरु

१ हजार ९१० आशा सेविकांचे मोबाईल सुविधेतून सक्षमीकरण

भारतीय हवाई दल अंतर्गत मोठी भरती

अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मोठी बातमी : 18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय