पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण केल्यास देशाच्या भावी पिढीमध्ये स्वच्छतेची मुळे रुजतील, असे मत मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील यांनी व्यक्त केले. (PCMC)
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज आयोजित करण्यात आलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेत सुमारे ६५० प्रशिक्षणार्थी तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे कार्यालयीन अधिक्षक उमा दरवेश, गटनिदेशक किसन खरात, शर्मिला काराबळे, मनोज ढेरंगे, शैलेश तिकोणे, प्रकाश घोडके, मुख्य लिपिक सुभाष कुंभार, प्रविण शेलार, विजय भैलुमे, मयुरी वाडेकर, सर्व निदेशक, स्वच्छता कर्मचारी, सर्पमित्र, आय इ सी बेसिक्स संस्थेचे कर्मचारी यांच्यासह प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
या विशेष स्वच्छता मोहिमेत मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा आवार व परिसरातील स्वच्छता करण्यात आली. यावेळी माझी वसुंधरेची शपथ देखील घेण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज ढेरंगे यांनी केले तर आभार पौर्णिमा भोर यांनी मानले.