पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : चिखली शरद नगर येथील बोधिसत्व प्रतिष्ठान शिक्षण संस्था संचालित राजर्षी शाहू महाराज विद्यालयांमध्ये राजर्षी शाहू महाराज यांची 150 वी जयंती तसेच विद्यालयाचा 8 वा नामकरण दिन साजरा करण्यात आला. (PCMC)
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संतपीठ विद्यालय व जुनियर कॉलेज चिखलीचे प्राचार्य ज्ञानेश्वर घाडगे, साई श्रद्धा फाउंडेशनच्या अध्यक्षा सोनाली पाटील, पत्रकार शिवाजी घोडे, राष्ट्रीय स्तरावरील माजी खेळाडू मोरे साहेब, अनिल पाटील, विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी शारदा भोकरे व विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबाजी शिंदे उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इयत्ता दहावीच्या मार्च 2023 साली झालेल्या परीक्षेमध्ये प्रथम तीन क्रमांकाचे मानकरी असलेल्या विद्यार्थ्याचा साई-श्रद्धा फाउंडेशन च्या वतीने ट्रॉफी देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयी आपली मनोगते व्यक्त केली. विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबाजी शिंदे यांनी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करत असताना राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचा आढावा घेतला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले संतपिठ विद्यालय व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य ज्ञानेश्वर घाडगे यांनी विद्यालयातील जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. pcmc
त्याचबरोबर विद्यालयातील क्रीडाशिक्षक संतोष घरडे, नुकतेच विद्यालयात नव्याने रुजू झालेले सोमनाथ थोरात तसेच विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी शारदाताई भोकरे यांनीही आपल्या भाषणातून शाळेच्या जुन्या आठवणी व राजर्षी शाहू महाराज यांच्या विषयी आपले मत मांडले. यावेळी पत्रकार शिवाजी घोडे यांनीही विचार प्रकट केले. pcmc
यावेळी राजर्षी शाहू महाराज यांच्या 150 व्या जयंतीच्या निमित्ताने भारतीय बौद्धजन विकास समिती पिंपरी-चिंचवड यांच्या माध्यमातून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पेनाचे वाटप करण्यात आले. विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी शारदाताई भोकरे बारस्कर व राणी शितोळे यांनी विद्यालयाला एक भेटवस्तू दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वाती पाटील, संतोष घरडे, सुजाता जोगदंड, रुपाली पवार, संदीप बोर्गे, कोमल गायकवाड, जितेंद्र सूर्यवंशी, किशोर बडे, सोमनाथ थोरात, होनमाने मॅडम, अमोल सूर्यवंशी, प्रमोद रायकर, धुडकू कुवर, स्वप्निल पठारे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद डोंगरदिवे यांनी केले तर आभार पूनम तारक यांनी मानले.
मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.