Thursday, July 4, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना ; महिंद्रा लॉजिस्टिक्स लि. युनिट वर्धापनदिन...

PCMC : स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना ; महिंद्रा लॉजिस्टिक्स लि. युनिट वर्धापनदिन संपन्न

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना युनिट महिंद्रा लॉजिस्टिक्स लि. ७ वा वर्धापन दिन संघटनेचे प्रमुख सल्लागार भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या सहकार्याने (दि.२९ जुन) चाकण येथे साजरा करण्यात आला. PCMC

त्यानिमित्ताने आज वृक्षारोपण व भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरामध्ये संघटनेच्या २२१ सभासद कामगार रक्तदात्यांनी रक्तदान केले. PCMC

कार्यक्रमाच्या निमित्ताने संघटनेचे सल्लागार रोहिदास गाडे, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जीवन येळवंडे, सरचिटणीस कृष्णा रोहोकले, सहचिटणीस रघुनाथ मोरे, खजिनदार अमृत चौधरी, हिताची अस्तेमो एम्प्लॉईस युनियनचे उपाध्यक्ष भट्टू पाटील, महिंद्रा लॉजिस्टिक्सचे युनिट अध्यक्ष सागर साकोरे, उपाध्यक्ष प्रविण नाळे, सचिव गणेश भुजबळ, सह सचिव शुभम बवले, खजिनदार प्रशांत म्हस्के, सदस्य राजू मेदगे, प्रविण गायकवाड, हर्षद सवासे, सचिन वहिले

तसेच सर्व कामगार बंधू, तसेच महिंद्रा लॉजिस्टिक्स व्यवस्थापनाचे प्लांट हेड निंबा भांभरे, एच.आर. हेड धीरज सिंग, एच. आर. मॅनेजर किरण म्हसे, सेफ्टी ऑफिसर राहुल चोरमुंगे, M&M CSO चे किरण चिंचोरे साहेब, तसेच इतर व्यवस्थापकीय अधिकारी आणि बहुसंख्य कामगार बंधू उपस्थित होते. PCMC

या भव्य दिव्य कार्यक्रमाच्या निमित्ताने एच. आर. हेड धीरज सिंग, संघटनेचे अध्यक्ष जीवन येळवंडे, सरचिटणीस कृष्णा रोहोकले, यांनी उपस्थित कामावर बंधूंना मार्गदर्शन करून रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास एक हेल्मेट तसेच रेनकोट देऊन सन्मानित करण्यात आले.

युनिट सचिव गणेश भुजबळ यांनी उपस्थितांचे आभार मानून सर्व कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय