Saturday, December 21, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : सशक्त, सुसंस्कृत जबाबदार युथ घडवण्याचा संकल्प! महेशदादा एजुकेशनल फाउंडेशनचा पुढाकार

PCMC : सशक्त, सुसंस्कृत जबाबदार युथ घडवण्याचा संकल्प! महेशदादा एजुकेशनल फाउंडेशनचा पुढाकार

शहरातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये उपक्रम (PCMC)

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : सुसंकृत पिढी घडविण्यासाठी त्यांचा पाया म्हणून विद्यार्थांना स्पर्धा परीक्षेचे शिक्षण पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व माध्यमांचा शाळांमध्ये सुमारे १ लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांसाठी ‘‘चला महाराष्ट्र घडवूया’’ हा क्रांतिकारी शैक्षणिक उपक्रम राबवला जात आहे. (PCMC)

पिंपरी-चिंचवडमधील महेशदादा एजुकेशनल फॉउंडेशन, एक घास फॉउंडेशन व आयआयबी करियर इन्स्टिट्युट यांचा संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जात आहे. हा उपक्रम देश पातळीवर तसेच महाराष्ट्रमध्ये सर्व प्रथमच होत आहे. या उपक्रमा अंतर्गत पिंपरी चिंचवड शहरामध्ये सर्व माध्यमाच्या शाळामध्ये UPSC/MPSC : IAS/ IPS/ IRS / IFS , NEET / JEE / MHT-CET, NDA, CA, Banking, Rail-ways, CLAT न्यायाधीश सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी इयत्ता ५ वी / ७ वी पासूनच आणि तेही निःशुल्क / मोफत उपलब्ध होणार आहे.

आदर्श व संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी शैक्षणिक शिक्षणासोबत संस्कार वर्ग, मेडिटेशन कॅम्प सुद्धा घेतले जाणार आहेत. या अनुषंगाने या उपक्रमाची माहिती सर्व शाळेचा प्राचार्यांना देण्यासाठी बुधवारी दि. ४ सप्टेंबर २०२४ रोजी १२ वाजता शिबीराचे आयोजन आयआयबी करिअर इन्स्टिटयूट, मोरवाडी येथे आयोजन करण्यात आहे.

जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांपर्यंत उपक्रम पोहोचवण्याचा संकल्प…

महेशदादा एजुकेशनल फॉउंडेशनचे अध्यक्ष आमदार महेश लांडगे, आयआयबी करिअर इन्स्टिटयूटचे संचालक ॲड. महेश लोहारे, तसेच एक घास फॉउंडेशनचे अध्यक्ष प्रा. शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाचे आयोजन केले आले असून, पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व माध्यमाच्या शाळांच्या संस्थापक / अध्यक्ष, प्राचार्य, कॉ- ऑर्डीनटोर यांना या क्रांतिकारी शैक्षणिक उपक्रमामध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यानं पर्यंत हा क्रांतिकारी शैक्षणिक उपक्रम पोहचवावा. तसेच, इच्छुक शाळांनी रजिस्ट्रेशनसाठी ७४९९५६७४४५ / ८०५५७३०८४५ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन केले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय