Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : भोसरी येथे संगणक प्रशिक्षण, संशोधनासाठी नव्या इमारतीचा प्रस्ताव

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दि.१२ – भोसरी येथील सेक्टर १२ मधील १० एकर जागेवर संगणक प्रशिक्षण,संशोधन, विकास आणि शैक्षणिक सुविधांचा मोठा विस्तार करण्यासाठी अत्याधुनिक आणि सुसज्ज इमारत बांधण्यात येणार असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सहसचिव संकेत भोंडवे यांनी दिली. pcmc

सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (सी-डॅक), पुणे यांचे वतीने भोसरी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) यांच्या जागेवर अत्याधुनिक इमारत उभारण्यात येणार आहे, त्या जागेची पाहणी सहसचिव संकेत भोंडवे यांनी आज केली त्यावेळी ते बोलत होते.

निवृत्त कर्नल तसेच कार्यकारी कॉर्पोरेट स्ट्रॅटेजीचे संचालक ए.के. नाथ आणि महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी शहर अभियंता मकरंद निकम, उप आयुक्त रविकिरण घोडके, आण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, पुणे येथील सी-डॅकचे वरिष्ठ अधिकारी तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. pcmc news

माहिती तंत्रज्ञानासाठी निश्चित केलेल्या क्षेत्रातील या वेगाने विकसित होणाऱ्या टाउनशिपमध्ये ही जमीन धोरणात्मकदृष्ट्या सुरक्षित असणार आहे. विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात एक सर्वसमावेशक शैक्षणिक सुविधेची स्थापना केली जाणार आहे.

या अत्याधुनिक सुविधेमध्ये व्हीएलएसआय, एचपीसी, बिग डेटा, एआय इत्यादी सारख्या विशिष्ट आणि उच्च श्रेणीतील तंत्रज्ञान क्षेत्रात विविध सी-डॅक आयटी अभ्यासक्रमाचे शिक्षण विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.(Education of IT courses)

या विकासामुळे सी-डॅकचा विस्तार होण्यास मदत मिळेल तसेच उच्च श्रेणीतील कौशल्य विकास क्षेत्रात विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी मिळेल. सध्या, सी-डॅक ऍडव्हान्स कंप्युटींग ट्रेनिंग स्कुल (ऍक्ट्स), पुणे येथे ६५० विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात. या अभ्यासक्रमाच्या प्रचंड मागणीमुळे ही क्षमता आता १ हजार ते १ हजार २०० विद्यार्थ्यांपर्यंत वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. pcmc

त्यानंतरच्या टप्प्यात, सी-डॅकने उच्च श्रेणीतील डेटासेंटर्ससह अत्याधुनिक संशोधन आणि विकास सुविधा स्थापन करण्याची योजना आखली आहे. ज्यात स्वदेशी उच्च-कार्यक्षम संगणक सुविधा देण्यात येणार आहे.

---Advertisement---

या सुविधेमध्ये नेक्स्ट-जनरेशन सुपर कॉम्प्युटर्स, इंटरकनेक्ट्स आणि संबंधित तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी समर्पित प्रगत आर ऍन्ड डी लॅबचा समावेश असणार आहे.

चिखलीमध्ये प्रगत शैक्षणिक आणि संशोधन सुविधांची स्थापना ही सी-डॅकच्या तंत्रज्ञान शिक्षण आणि संशोधनातील उत्कृष्टतेसाठी चालू असलेल्या वचनबद्धतेतील एक महत्त्वपूर्ण टप्पा असणार आहे.

उभारण्यात येणा-या इमारतीमध्ये अत्याधुनिक वास्तुरचना, वायुवीजन, सुसज्ज वाहनतळ, हेलिपॅड, ड्रोनपॅड,सोलर सिस्टीम, पर्यावरणपूरक परिसर आदी सुविधांचा समावेश असणार आहे.

हा उपक्रम उच्च-स्तरीय शैक्षणिक अभ्यासक्रम आणि अत्याधुनिक संशोधनाच्या संधी प्रदान करतो, जो देशाच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या भविष्याला आकार देण्यासाठी फायदेशीर ठरणार असल्याचे सहसचिव संकेत भोंडवे यांनी सांगितले.

---Advertisement---
whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : अयोध्येतून विजयी झालेल्या सपा खासदाराचा राजीनामा

सीमा सुरक्षा दल अंतर्गत मोठी भरती; पात्रता 10वी/12वी/पदवी/ITI/नर्सिंग/डिप्लोमा

सरकार स्थापनेनंतर रेशन कार्ड धारकांना आनंदाची बातमी, सरकारकडून “हा” मोठा निर्णय

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली, मध्यरात्री लावले सलाईन

कंगना आणि मी पती-पत्नी सारखे राहिलो, अभिनेत्याचा मोठा खुलासा

चालू कार्यक्रमात रजत शर्मा यांच्याकडून काँग्रेसच्या महिला प्रवक्त्यांना शिवीगाळ

ब्रेकिंग : केंद्रीय मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर, वाचा कुणाला मिळाले कोणते खाते ?

मोठी बातमी : शाळकरी मुलांसाठी ‘एक राज्य एक गणवेश’ योजना लागू होणार

Manipur : अस्वस्थ मणिपूर, शांत करा, संघाचा (RSS) केंद्र सरकारला इशारा?

Air Force : इंडियन एअर फोर्स कॉमन एडमिशन टेस्टमध्ये 304 पदांसाठी भरती

मोठी बातमी : डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्यावर हल्ला

---Advertisement---

ब्रेकिंग : ममता बॅनर्जी यांचा मोठा दावा काही दिवसांत इंडिया आघाडीचे सरकार

मोठी बातमी : इंडिया आघाडीकडून नितिश कुमार यांना पंतप्रधान पदाची ऑफर

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles