पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर : सनराईज एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, इन्स्पायर अबॅकस अकॅडमीच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेचे बक्षीस वितरण चोविसावाडी येथे करण्यात आले. या स्पर्धेसाठी देशभरातून ७५७ विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रशाली दिघावकर- जाधव , कृष्णा विकास महामंडळ संचालक रामशेठ गावडे, आष्टी पंचायत समितीचे सभापती गोपाळ रकटाटे, माजी नगरसेवक विकास डोळस भाजपचे सरचिटणीस कुलदीप परांडे, शिक्षक क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिनकर मुंढे, माजी सैनिक संजय ठोंबरे,पर्यवेक्षक विलास पाटील, शिक्षक सहकारी पतसंस्था अध्यक्ष हरेश चौधरी,तावरे, विधी अधिकारी ॲड विकास चव्हाण, उद्योजक करण तावरे ,चेतन बोराटे, इंसपायरचे संचालक प्रदीप भद्रे, सत्यशीला भद्रे,आदी उपस्थित होते.
यावेळी उपजिल्हाधिकारी दिघावकर म्हण्याल्या कि, पालकांनी आपल्या मुलांवर अपेक्षांचे ओझे लादू नका. त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करू द्या. प्रदीप भद्रे म्हणाले कि, इन्स्पायर अबॅकस अकॅडमी ही शालेय विद्यार्थ्यांसाठी शास्त्रीय संकल्पनेवर आधारित परिपूर्ण बौद्धिक विकास करणारे केंद्र असून गरजू व होतकरू महिलांसाठी अबॅकस व वैदिक गणिताचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे.
राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी पैकी अविनाश शुक्ला, श्रीराज चव्हाण, श्रीधर भुरे, स्वरा खेत्रे , कृष्णा मेटे, माधवी जाधव, शर्वरी वायाळ, स्वानंदी साळुंखे, श्रावणी माळी, योगिता पाडळे, पियुष इंगळे, सर्वज्ञ ताठे या विद्यार्थ्यांनी चॅम्पियन ट्रॉफी चे सर्वोत्तम पारितोषिक मिळविले. तसेच अकॅडमीच्या वतीने अर्चना ठोंबरे, कांचन किटुकले या शिक्षिकांना स्टार टीचर अवार्ड तसेच अश्विनी शिंदे , रुपाली शेटे, संगीता परदेशी, दिपीता गर्जे, ज्योत्सना महाजन व पल्लवी साळी यांना बेस्ट टीचर अवार्ड, त्याचबरोबर स्वराली साळुंखे, समृद्धी लोखंडे, सानवी लोखंडे व दुर्वा लोखंडे याना अबॅकस मास्टर अवार्ड देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेच्या संचालिका सत्यशीला भद्रे, अर्चना शेळके, संचालक प्रदिप भद्रे, दादासाहेब शेळके, रवींद्र रकटाटे, नामदेव रकटाटे, निळकंठ रकटाटे, जय शेळके यांनी विशेष परिश्रम घेतले .व त्यांना या कार्यात अकॅडमीतील सर्व शिक्षिकांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष प्रदिप भद्रे ,आभार प्रदर्शन निळकंठ रकटाटे ,ईशस्तवन व स्वागतगीत गायन आर्या लोहकरे, सार्थक चव्हाण तसेच सूत्रसंचालन सागर हिरवे यांनी केले.