Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : डासोत्पत्ती ठिकाणावर दंडात्मक कारवाई - १ लाख ८६ हजार रुपयांचा...

PCMC : डासोत्पत्ती ठिकाणावर दंडात्मक कारवाई – १ लाख ८६ हजार रुपयांचा दंड

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने व्यावसायिक आस्थापना, गृह सोसायट्यांसह घरांची तपासणी मोहीम तीव्र करण्यात आली असून डासोत्पत्ती ठिकाणे आढळल्यामुळे आज दंडात्मक कारवाई करण्यात आली असून सुमारे लाख ८६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे यांनी दिली. (PCMC)

शहरात किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी तपासणी मोहिम तीव्र करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरात राबविण्यात येणारी तपासणी मोहीम तीव्र करण्यात आली असून डासोत्पत्तीची ठिकाणे आढळलेल्या व्यक्ती आणि आस्थापनांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

आज केलेल्या तपासणी मोहिमेत अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ६४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत १२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत १९ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. इ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ४३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत १३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत १ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. (PCMC)

आज नागरिकांवर करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान एकूण १ लाख ८६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. १ जूनपासून आत्तापर्यंत एकूण सुमारे २४ लाखांपेक्षा अधिक दंड या मोहिमेच्या माध्यमातुन वसूल करण्यात आला आहे असल्याचे सहाय्यक आयुक्त येळे यांनी सांगितले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

पुण्यातील निळ्या पूररेषेतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा आराखडा तातडीने तयार करण्याचे निर्देश

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

ब्रेकिंग : जुन्नर येथील इंगळून घाटात दरड कोसळली, या गावांचा संपर्क तुटला

मोठी बातमी : संसदेतील ‘त्या’ भाषणानंतर राहुल गांधींवर ईडीची छापेमारी होणार ?

Jio, Airtel चे टेन्शन वाढले ; TATA आणि BSNL मध्ये मोठा करार

ब्रेकिंग : माझी लाडकी बहीण योजने संदर्भात नवीन माहिती समोर

मोठी भरती : भारतीय टपाल विभागात 44228 पदांची भरती; पात्रता 10वी पास

भावडांसोबत खेळताना दोरीचा फास लागून 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

संबंधित लेख

लोकप्रिय