Saturday, December 21, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : आंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस मध्ये पीसीसीओई आणि डीवायपी यांचा प्रथम...

PCMC : आंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस मध्ये पीसीसीओई आणि डीवायपी यांचा प्रथम क्रमांक

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे जिल्हा विभागीय क्रीडा मंडळ समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या अंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस मुलींच्या स्पर्धेत निगडी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंगने (पीसीसीओई) आणि मुलांच्या स्पर्धेत आकुर्डी येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंगने प्रथम क्रमांक पटकावला. (PCMC)

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग आणि रिसर्च (पीसीसीओईआर) येथे या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांच्या हस्ते झाले.

यावेळी वरिष्ठ क्रीडा संचालक डॉ. शोभा शिंदे, सचिव डॉ. उमेश पनेरू, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. मिलिंद थोरात, प्रा. संतोष पाचरणे, प्रा. अमृता शिंदे व इतर महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक आदी उपस्थित होते. मुलींच्या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजने आणि तृतीय क्रमांक ताथवडे येथील इंदिरा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्याल यांनी मिळविला. (PCMC)

मुलांच्या स्पर्धेत ताथवडे येथील राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजीनियरिंगने दुसरा क्रमांक आणि निगडी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंगने यांनी मिळविला.

स्पर्धा संयोजनात प्रा. संतोष पाचरणे, डॉ.अनिल कमलापुरे, प्रा. विवेक भोसले, प्रा. ऐश्वर्या पवार, प्रा. जयश्री बागे, प्रा. अक्षय काशीद, प्रा. रवींद्र टक्के, प्रा. साकेत निकाळजे, डॉ. पांडुरंग लोहाटे, डॉ. प्रतिमा लोणारी, प्रा. साहिल बागवान, डॉ. हरबंस लाल चव्हाण, प्रा. आबाजी माने, प्रा.अतुल गोरे, प्रा. अमोल आहेर व शारीरिक शिक्षण संचालकांनी सहभाग घेतला.

विजेत्या संघाचे व संघ व्यवस्थापकांचे पीसीईटी चे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी अभिनंदन केले व विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख

लोकप्रिय