Tuesday, July 2, 2024
Homeताज्या बातम्याPCMC : 'साथ चल' उपक्रमात 'वुई टुगेदर फाउंडेशन' चा सहभाग ; वारी...

PCMC : ‘साथ चल’ उपक्रमात ‘वुई टुगेदर फाउंडेशन’ चा सहभाग ; वारी विठुरायाची जल संवर्धनासाठी  

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : औद्योगिक नगरीत आज पहाटे मुंबई पुणे महामार्गावर दैनिक सकाळ समूह आणि फिनोलेक्स कंपनीच्या वतीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. PCMC

पिंपरी चिंचवड शहरात कार्यरत असलेल्या विविध सेवाभावी संस्था (NGO), विद्यार्थी युवक जेष्ठ नागरिक संघटना सह हजारो नागरिकांनी जलसंवर्धनाची शपथ घेतली. त्यानंतर शेकडो स्वयंसेवक दोन किमी वारकऱ्यांच्या दिंडी बरोबर पायी वारी केली. यावेळी वुई टुगेदर फाउंडेशनचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. PCMC

देशातील विविध शहरातील पाणी टंचाई, नदी प्रदूषण, ग्रामीण भागातील दुष्काळ याबाबत प्रतिक्रिया PCMC

भविष्यात शहरात भीषण पाणी टंचाई आहे, काटकसरीने पाणी वापरू – खुशाल दुसाने 

पाणी निसर्गाची कृपा आहे, पाणी सरकार निर्माण करू शकत नाही, पाण्या अभावी पिकं करपल्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, ग्रामीण भागात दुष्काळामुळे गरीब महिला चार चार किलोमीटर डोक्यावर हांडे घेऊन पाणी आणत आहेत, हे पाहून अंगावर काटा येतो.

घरातील नळ गळतीमुळे होणारी पाण्याची नासाडी, धुण्यासाठी पाण्याचा अतिवापर, वापरानंतर उघडे सोडलेले नळ, गाड्या धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरणे, ई विविध कारणांमुळे शहरात पाणीटंचाईच्या समस्या आहेत, जल संवर्धन करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला सहकार्य करू या, असे खुशाल दुसाने (WE TOGETHER FOUNDATION) यांनी सांगितले.

पाणी ग्रामीण भागातून शहरात येते, आपण बचत करूया – श्रीकांत गोंदकर 

आपण समृध्द अशा सुसंस्कृत शहराचे नागरिक आहोत, पाणी विकत मिळते, आम्ही पाण्यासाठी महापालिकेला पैसे देतो, टंचाईच्या काळात टँकरने विकत घेतो, पण हे पाणी ग्रामीण भागातून धरणातून नद्यांतून शहराला मिळते. याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. देशातील बंगळूर, चेन्नई, दिल्ली मध्ये भीषण पाणी टंचाई आहे, सरकारे हतबल झाली आहेत, दुष्काळ आहे, ग्लोबल वॉर्मिग मुळे  मान्सून चक्र बदललेले आहे. अशावेळी शहरी भागात सुसंस्कृत वस्त्यांमध्येही अशा प्रकारचा पाण्याचा अपव्यय होऊन नये यासाठी जल साक्षरता वाढवणारा साथ चल हा जल प्रबोधनाचा संकल्प करण्यासाठी आम्ही वारीमध्ये सामील झालो आहोत, असे संस्थेचे सदस्य श्रीकांत गोंदकर यांनी सांगितले.

जल संवर्धनासाठी साथ चल हा राष्ट्रीय प्रबोधन उपक्रम आहे – धनंजय मांडके 

पाण्याला जीवन असे म्हटले जाते. सजीव सृष्टीतील जीवजंतू, पशू पक्षी निसर्गाच्या नियमानुसार पाणी पितात. मानवी विकास, प्रगती, शेती उद्योग उन्नतीसाठी पाणी आवश्यक आहे. घरातील नळांची गळती अजिबात होऊ देऊ नये. थेंब थेंब गळणाऱ्या नळातून दिवसाला ३० ते ४० लिटर पाणी वाया जाते, ही गळती थांबवावी. शॉवरमुळे पाण्याची बचत होते, पण त्याखाली तासनतास उभे राहू नका व पाण्याचा अपव्यय टाळा. सोसायट्यांच्या छतावरील पाणी जमिनीत मुरले तर भूजल वाढेल, रेन वॉटर हार्वेस्टिंग करून सोसायट्यांचे पाणी प्रश्न सुटतील. महासागरात भरपूर पाणी पण पिण्यासाठी एक थेंब उपयोगाचा नाही, हे सर्वांनी समजून घ्यावे, जल है तो कल है, जल संवर्धनासाठी साथ चल ह्या  राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होताना आनंद होत आहे, असे धनंजय मांडके  म्हणाले. (WE TOGETHER FOUNDATION)

‘जल संवर्धनासाठी साथ चल’ या प्रबोधन उपक्रमात वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष सलीम सय्यद, सल्लागार मधुकर बच्चे, जयंत कुलकर्णी, अनघा पाटील, विद्यार्थी समुपदेशक प्रा. दीपक जाधव यांचेसह दिलीप चक्रे, जयंत कुलकर्णी, अनघा पाटील सुरेंद्र जगताप, अर्जुन गावडे, अरविंद पाटील, अक्षय पाटील, श्रीरंग दाते, शैलजा कडुलकर, रोहिणी बच्चे, श्रीकांत गोंदकर, रविंद्र शेटे, पुष्करणी देशपांडे, खुशाल दुसाने, रविंद्र काळे, रमेश गिजरे, गणेश बच्चे, धनंजय मांडके, काजल गावडे – बच्चे, श्रावणी बच्चे, योगेश शेंडे, आसावरी बच्चे, अर्चना बच्चे, राजू कोरे, अभिजित देशपांडे आदी मान्यवरांनी फिनोलेक्स चौक ते हिंदुस्थान अँटिबायोटिक्स मैदान शिवाजी पुतळा येथे वारकऱ्यांच्या बरोबरीने पायी वारी केली.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

‘माझी लाडकी बहीण योजना’ महिलांना मिळणार महिना 1500 रूपये; ‘अशी’ आहे अर्ज प्रक्रिया!

Barti : यूपीएससी, एमपीएससीचे मोफत प्रशिक्षण; ‘इतके’ हजार रुपये मिळणार विद्यावेतन

Indian Bank : इंडियन बँक अंतर्गत तब्बल 102 जागांसाठी भरती

मोठी बातमी : विराट कोहली पाठोपाठ कर्णधार रोहित शर्माचाही मोठा निर्णय

मोठी बातमी : टी-20 विश्वचषकाच्या विजयानंतर विराट कोहलीची मोठी घोषणा

T20 World Cup : टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचा ऐतिहासिक विजय

India Post : भारतीय पोस्ट मध्ये 10वी पाससाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी!

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 8326 जागांसाठी नवीन भरती; पात्रता 10वी पास

ब्रेकिंग : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

अर्थसंकल्पाने शेतकऱ्यांना काय दिले वाचा !

बजेट : युवा वर्गासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा !

अजित पवार यांच्याकडून पायाभूत सुविधा आणि अन्य क्षेत्रांबाबत महत्वाच्या घोषणा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय