Sunday, December 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांना...

PCMC : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांना बदाम भेट

मुलींच्या मोफत शिक्षणासाठी केलेल्या घोषणेचा पडला विसर म्हणून पोस्टाने पाठवले बदाम PCMC


पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर: महाराष्ट्र राज्य महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या सूचनेनुसार पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने खोटारड्या आणि थापाड्या सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. दि. 9 फेब्रुवारी रोजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ज्या पालकाचे उत्पन्न वार्षिक आठ लाखापेक्षा कमी आहे त्या मुलींना बारावी नंतरचे उच्च शिक्षण मोफत देण्याची घोषणा केली होती. PCMC

महाराष्ट्रातील तमाम गरजू भगिनींच्या उच्च शिक्षणाच्या आशा पल्लवीत झाल्या. उच्च शिक्षणातील अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी, अशा विविध प्रकारच्या सध्याच्या 642 आणि नव्याने सुरु होणाऱ्या 200 अभ्यासक्रमांसाठी म्हणजेच जवळपास 850 अभ्यासक्रमांसाठी ही सवलत लागू राहणार असल्याचेही आपण स्पष्ट केले होते. परंतु अशा कोणत्याच प्रकारच्या योजनेची अंमलबजावणी झाली दिसत नाही. pcmc

त्यामुळे शिक्षण मंत्री जे घोषणा करतात त्या घोषणेचा त्यांना विसर पडला की काय यासाठी त्यांची स्मरणशक्ती वाढावी, म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने त्यांना निवेदन आणि त्यात बदाम पाठवण्यात आले आहे.

याप्रसंगी राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर, प्रदेश सचिव आणि माजी उपमहापौर विश्रांती पाडाळे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष स्वप्नाली आसोले, भोसरी विधानसभा अध्यक्ष सारिका हरगुडे, पिंपरी विधानसभा उपाध्यक्ष कल्पना घाडगे, शहर उपाध्यक्ष रेखा मोरे, शहर समन्वयक जयमाला कदम, शहर सरचिटणीस ताहिरा बी सय्यद, विमल विटकर, पिंपरी विधानसभा उपाध्यक्ष कमल दाहिंजे, सारिका कंडारे या महिला उपस्थित होत्या.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : दिल्ली विमानतळावर भीषण अपघात, विमानतळाच्या पार्किंगचे छत कोसळले

मोठी बातमी : राज्याचा अर्थसंकल्प जाहीर, अर्थमंत्र्यांकडून अनेक घोषणांचा पाऊस

बेकायदेशीर पब-बार, अमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर मोठी कारवाई

अहमदनगर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत लिपिक पदाची मोठी भरती

मोठी बातमी : शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

विरोधी पक्षनेते राहुल गांधींना मिळणार अनेक अधिकार, मोदी सरकारची होणार अडचण !

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 17,727 जागांसाठी भरती सुरु

१ हजार ९१० आशा सेविकांचे मोबाईल सुविधेतून सक्षमीकरण

भारतीय हवाई दल अंतर्गत मोठी भरती

अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मोठी बातमी : 18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड

संबंधित लेख

लोकप्रिय