Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : पावसाळापूर्व कामांसाठी आमदार महेश लांडगेंची ‘टीम’ मैदानात!

PCMC : पावसाळापूर्व कामांसाठी आमदार महेश लांडगेंची ‘टीम’ मैदानात!

प्रभागनिहाय महापालिका अधिकाऱ्यांसोबत पाहणी

आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासन अन्‌ पदाधिकारी सतर्क

पिंपरी-चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील भोसरी विधानसभा मतदार संघात पावसाळा पूर्व कामे मार्गी लावण्यासाठी तसेच, आपत्ती व्यवस्थान व नियोजन अचूक करण्यासाठी भाजपाचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landage) यांची ‘टीम’ महापालिका प्रशासनासोबत मैदानात उतरली आहे.

मुंबई-घाटकोपर येथे वादळी पावसामुळे होर्डिंग कोसळून १८ नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पिंपरी-चिंचवड मध्ये मोशी येथील जयगणेश साम्राज्य चौकात होर्डिंग कोसळले. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणहीही जीवित हानी झालेली नाही. मात्र, पावसाळापूर्व (pre-monsoon work) कामे आणि आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management) विभाग सज्ज करण्यासाठी आमदार लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे. pcmc news

भोसरी विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकांसाठी आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने ‘परिवर्तन हेल्पलाईन-93799 09090’ सुविधा सुरू आहे. सार्वजनिक जनहिताच्या दृष्टीने नागरी समस्या सोडवण्यासाठी ‘परिवर्तन’चे स्वयंसेवक प्रभागनिहाय काम करीत आहेत. pcmc news

महापालिका क्षेत्रीय कार्यालय आणि परिवर्तनचे स्वयंसेवक यांच्या माध्यमातून परिसरातील नाले, ओढे आणि पाणी साचणाची शक्यता असलेल्या ठिकाणांची पाहणी करण्यात येत आहे. तसेच, मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास जनजीवन विस्कळीत होणार नाही. तसेच, वीज वाहिन्या तुटणे किंवा वृक्ष कोसळणे अशा घटना झाल्यास आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन विभाग तसेच आरोग्य विभागाच्या माध्यमातून कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात. या करिता आढावा घेतला जात आहे, अशी माहिती ‘परिवर्तन’चे समन्वयक ऋषभ खरात यांनी दिली.

प्रतिक्रिया :

मुंबई- घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटना घडली आहे. गेल्यावर्षी किवळेतील होर्डिंग दुर्घटनेमध्ये ५ नागरिकांना जीव गमवावा लागला. शहरातील होर्डिंगचे ऑडिट करावे, अशी मागणी आम्ही केली होती. त्यावर प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. आता पावसाळापूर्व कामे मार्गी लावावी आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे. या भूमिकेतून केवळ प्रशासनावर अवलंबून न राहाता आम्ही ‘परिवर्तन हेल्पलाईन’च्या माध्यमातून प्रभागनिहाय काम करीत आहोत. प्रशासन आणि आम्ही लोकप्रतिनिधी एकत्रित सकारात्मक भूमिकेतून काम केले, तर निश्चितपणे नागरिकांना चांगल्या सुविधा आणि सेवा देता येईल, असा विश्वास आहे.

– महेश लांडगे,
आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

संबंधित लेख

लोकप्रिय