थेरगाव येथील गणेश मंदिरात नारळ वाढवून काढली भव्य पदयात्रा (PCMC)
पदयात्रेत महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एकजूट
मतदारांना अभिवादन करून मागितला विजयाचा आशीर्वाद
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचाराचा आज थेरगाव येथे शुभारंभ झाला. गणेश नगर येथील श्री गणरायाच्या चरणी नारळ वाढवून भव्य पदयात्रा काढण्यात आली. (PCMC)
यावेळी माजी उपमहापौर झामाताई बारणे, चिंचवड विधानसभा प्रचारप्रमुख काळूराम बारणे, माजी नगरसेवक सिद्धेश्वर बारणे, माजी नगरसेवक संतोष बारणे, शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र युवा सेनेचे सचिव विश्वजित बारणे, माजी नगरसेवक गोरक्षनाथ पाषाणकर, आरपीआय पक्षाचे शहराध्यक्ष कुणाल व्हावळकर, भारत केसरी पै. विजय गावडे, बबलू सोनकर, अभिषेक बारणे, राकेश बारणे, सनी बारणे, दिगंबर गुजर, करिष्मा बारणे, राजेश पुरोहित, रवी भिलारे, विनोद फंड, रशीद शेख, रोहन कुंभार, प्रताप बारणे यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोमवारी (दि. २८) भव्य शक्तिप्रदर्शन करत शंकर जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर लगेचच आज थेरगाव येथे प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी थेरगावमधील लोकमान्य कॉलनी, दुर्गा कॉलनी, गणपती मंदिर रोड, एकता कॉलनी, बुद्ध विहार, शिव कॉलनी, ओंकार कॉलनी, मंगल नगर, प्रेरणा शाळा रोड, गुजर नगर, संतोष नगर, जयभवानी नगर, १६ नंबर, गणेश कॉलनी, शिवदर्शन कॉलनी मार्ग, स्वप्न पुष्प कॉलनी, आदर्श कॉलनी, कन्हैया पार्क, ओंकार पार्क, बारणे कॉर्नर, पवार नगर, क्रांतिवीर नगर, तुळजाई कॉलनी, वनदेव नगर, आनंदवन सोसायटी, अभिजित पार्क, रॉयल कोर्ट, आनंद पार्क, श्रीकृष्ण कॉलनी, भोईर इस्टेट, डांगे चौक, डांगेचौक – चिंचवड रोड, सदाशिव कॉलनी दत्त मंदिर, दत्तनगर, अरुण पार्क या भागात भव्य पदयात्रा काढत जगताप यांनी नागरिकांना अभिवादन करून आशीर्वाद घेतले. (PCMC)
थेरगावमधील नागरिकांनीही मोठ्या उत्साहात जगताप यांचे ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतिषबाजी करत स्वागत केले. यावेळी महिलांनी जागोजागी जगताप यांचे औक्षण केले. व आम्ही तुमच्यासोबत आहोत हा विश्वास दिला. पदयात्रेदरम्यान जगताप यांनी थेरगावमधील तक्षशिला बौद्ध विहारासह विविध धार्मिक स्थळांना आणि समाज मंदिरांना भेट दिली.
यावेळी समाज बांधवांच्या वतीने जगताप यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.


हेही वाचा :
कॉँग्रेसची दुसरी यादी जाहीर ; वाचा कुणा कुणाला मिळाली संधी
आशा व गटप्रवर्तकांना निवडणूक कामाचा भत्ता देण्याची मागणी
जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ
लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर
पुण्यात सोन्याने भरलेला ट्रक सापडला, सर्वत्र एकच खळबळ
मविआतील बड्या नेत्यांविरोधात अजित पवारांचा मोठा डाव
अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर, झिशान सिद्दीकींनाही मिळालं तिकीट
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; मोठ्या शक्तिप्रदर्शनासह, दिग्गज नेत्यांचे अर्ज दाखल
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; महाविकास आघाडीचा मोठा प्लॅन
दाना’ चक्रीवादळाचा धडाका ; 56 पथके हाय अलर्टवर, महाराष्ट्रात काय परिणाम?
पिंपरी चिंचवडमध्ये दुर्दैवी दुर्घटना ; तीन मजुरांचा जागीच मृत्यू
इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमने-सामने?
अजित पवार गटाची यादी जाहीर, वाचा कुणा कुणाला मिळाली संधी
दाना चक्रीवादळ आज धडकण्याची शक्यता, महाराष्ट्रावर होणार का परिणाम?
मनसेची दुसरी उमेदवारी यादी जाहीर; राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात
शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर; मुख्यमंत्री शिंदेंसह अनेक उमेदवारांची नावे घोषित
भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर – 99 जागांसाठी उमेदवारांची नावे घोषित