Tuesday, July 2, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : किशोर थोरात यांना महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार

PCMC : किशोर थोरात यांना महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : युवा महाराष्ट्र फौंडेशन ,पुणे आयोजित “महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार २०२४” हा राज्यस्तरिय पुरस्कार चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर अण्णासाहेब थोरात यांना प्रदान करण्यात आला. या वर्षी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला गेला. नुकताच पुरस्कार वितरण सोहळा २८ जून २०२४ रोजी पंडित जवाहरलाल नेहरू ऑडिटोरिअम, घोले रोड,पुणे येथे संपन्न झाला. PCMC

सदर अवॉर्ड हा थोर समाजसेवक दीपक रत्नाकर दीक्षित, दक्षिण भारतीय अभिनेत्री विजयालक्ष्मी, समाजसेवक रवी अगरवाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. युवा महाराष्ट्र फौंडेशन चे अध्यक्ष डॉ. अविनाश सकुंडे यांनी हा पुरस्कार सोहळा आयोजित केला होता.

किशोर थोरात हे मागील दहा वर्षांपासून वेगवेगळ्या क्षेत्रात आपले उल्लेखनीय काम करत असल्याने हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

किशोर थोरात हे विविध संस्था मार्फत आपले सामाजिक काम करत असतात जसे की, आधार शैक्षणिक संस्था, पुणे (गरीब मुलांच्या शिक्षणाला मदत), शैक्षणिक क्षेत्र, सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ (मानव अधिकार क्षेत्र,स्वामी समर्थ सेवा प्रचिती-(अध्यात्म) आणि समर्थ सोशल फौंडेशन, कोल्हापूर (मधुमेहमुक्त आणि नशामुक्त भारत अभियान) अशा अनेक क्षेत्रात वेगवेगळ्या पदावर काम करून आपले योगदान समाजासाठी देत आहेत. pcmc

अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेले किशोर अण्णासाहेब थोरात यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी या अगोदरही विविध सामाजिक संस्थांकडून समाजरत्न २०२१, आदर्श समाजरत्न प्रेरणा २०२२, आयकॉन ऑफ आशिया २०२२, प्राईड ऑफ नेशन २०२२, आदर्श समाजभूषण प्रेरणा गौरव २०२२, स्टार इंडियन लीडर शिप अवॉर्ड २०२४, लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड २०२४ असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.

तर यापुढेही असेच विविध क्षेत्रात आपले उल्लेखनीय काम निश्चितच चालू ठेऊन देशाच्या हितासाठी एक खारीचा वाटा म्हणून काम करत राहणार असल्याचे आणि पुरस्कार हे प्रेरणा देतात व त्याचे फळ नक्कीच सेवेतून मिळत असल्याचे किशोर थोरात यांनी सांगितले.

महाराष्ट्र आयकॉन २०२४ हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल किशोर थोरात यांनी म्हणाले की, पुरस्कार हा माझ्या बरोबर सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्यांचा सन्मान आहे व सर्वांनी दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानले.

त्यांनी नुकताच दिनांक २३ जून रोजी “पैसे नको, रद्दी द्या” हा अभिनव उपक्रम देहुगाव येथील वात्सल्य मतिमंद मुलांची निवासी शाळा येथे राबविला असून पुढील महिन्यात एक झाड भविष्यासाठी हा वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला आहे, तर जास्तीत जास्त नागरिकांनी त्यात सहभाग घ्यावा असे त्यांनी आवाहन केले.

हा अवॉर्ड मिळाल्याबद्दल किशोर थोरात यांचे विविध स्थरातून कौतुक केले जात आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय