पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर)- १ मे २०२५ रोजी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, खराळवाडी, महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शहराध्यक्ष योगेश मंगलसेन बहल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. महाराष्ट्र दिनानिमित्ताने कार्यकर्त्यांसमोर आपले भाषण करतांना ते म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील एक प्रगत राज्य असून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा जोपासाणारे व साधू संतांच्या पद स्पर्शाने पावन ज्याचा पाया रचला, हुतात्मा आणि कामगार वर्गांनी संघटित होऊन त्याला आकार दिला असा हा समृध्द, संपन्न महाराष्ट्र असाच पुढे वाढत राहो, फुलत-बहरत जावो तसेच कामगार दिनानिमित्त कामगारांचा देखील गौरव होणे आवश्यक आहे. (PCMC)
कामगारांनी देशाच्या विकासासाठी खूप मोठे योगदान दिलेले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्र दिनानिमित्त मंगल कलश यात्रा पिंपरी चिंचवड शहरात आली. (PCMC)
त्यानिमित्त शहरांमध्ये विविध ठिकाणी यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेशच्या सूचनेनुसार १ मे ते ४ मे २०२५ पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले असून महाराष्ट्र दिनानिमित्ताने महाराष्ट्र राज्याला मी शहराच्यावतीने मानाचा मुजरा करतो व सर्व नागरिकांना व कामगारांना शुभेच्छा देतो.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड.गोरक्ष लोखंडे यांनी कामगार दिनाची माहिती देऊन सर्वांना मार्गदर्शन केले.
यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, चिंचवड विधानसभा संघटक सतीश दरेकर, भोसरी विधानसभा संघटक प्रकाश सोमवंशी, माजी नगरसेवक ॲड.गोरक्ष लोखंडे, मायला खत्री, राजेंद्र साळुंखे, हरिभाऊ तीकोणे, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, ओबीसी प्रदेश कार्याध्यक्ष सचिन औटे, ओबीसी सेल अध्यक्ष प्रशांत महाजन, सेवादल सेल अध्यक्ष महेश झपके, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष संजय औसरमल, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, प्रदेश सरचिटणीस राजेंद्रसिंग वालिया, व्यवस्थापन सेल अध्यक्ष अकबर मुल्ला, महिला वरिष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे, अर्बन सेल महिला अध्यक्ष मनीषा गटकळ, व्हिजेएनटी सेल अध्यक्ष निर्मला माने, प्रदीप गायकवाड, माऊली मोरे ,जावेद शेख, क्षमा सय्यद, अशोक मोरे, गोरोबा गुजर, बापू मस्के, तुकाराम बजळकर, कार्यालयीन संपर्क प्रमुख धनाजी तांबे, सुनील अडागळे इत्यादी पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार सेवादल अध्यक्ष महेश झपके यांनी मानले.
---Advertisement---
---Advertisement---
PCMC : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा
---Advertisement---
- Advertisement -