क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया तर्फे आयोजन
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया, पुणे शाखेच्या वतीने औद्योगिक सुरक्षा स्पर्धा 2024 चे आयोजन भोसरी येथील क्वॉलिटी सर्कल एक्सलन्स सेंटर येथे आयोजित करण्यात आले. या स्पर्धेत विविध औद्योगिक भागातील सुमारे 35 कंपन्यातील 501 स्पर्धकांनी सहभाग घेतला. pcmc
स्पर्धेचे उद्घाटन एस.के.एफ. कंपनीचे सेफ्टीहेड राहुल बोकील, थरमॅक्स इंडिया लि. पॉवर डिव्हीजनचे बिझनेस एक्सलन्स हेड गौरव शर्मा यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. फोरमच्या पुणे शाखेच्या अध्यक्षा डॉ. रजनी इंदुलकर व ईतर सदस्य डॉ.अजय फुलंबरकर, माधव बोरवणकर, अनंत क्षीरसागर यावेळी उपस्थित होते.
या स्पधेत 61 केस स्टडीज, 25 स्किट, 90 पोस्टर्स, 60 स्लोगन यांचा समावेश होता. एकूण 236 जणांना नामांकन प्राप्त झाले.
स्पर्धेच्या समारोप सत्रात प्रमुख पाहुणे कोथरुड येथील कमिन्स इंडिया लि., प्लाँटचे सेफ्टीहेड विजय हिरेमठ, क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश काळोखे, पुणे शाखेच्या अध्यक्षा डॉ. रजनी इंदुलकर, माधव बोरवणकर, संजीव शिंदे, डॉ. अजय फुलंबरकर, भूपेश मॉल व परिक्षकांच्या हस्ते विजेत्यांना सुवर्ण, रजत व कांस्य पदक प्रदान केले. pcmc
कार्यक्रमाचे आयोजन प्रशांत बोराटे व चंद्रशेखर रुमाले यांनी तर सूत्रसंचालन विजया रुमाले यांनी केले.
![whatsapp link](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/whatsapp.gif)
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/google-news-GIF.gif)
हे ही वाचा :
Mirzapur 3 : मिर्झापूरच्या तिसऱ्या सिझनच्या रिलीज संदर्भात महत्वाची माहिती समोर
ब्रेकिंग : प्रकाश आंबेडकर यांचा लेटर बाँब, महाविकास आघाडी नव्हे तर ‘या’ पक्षाकडे युतीचा प्रस्ताव
ब्रेकिंग : राज ठाकरे आणि अमित शहांची भेट, राज ठाकरें लवकरच मोठा निर्णय घेणार
ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्वाची घडामोड
बाबा रामदेव यांना झटका; सर्वोच्च न्यायालयाची अवमान नोटीस
Police Bharti : पोलीस भरती प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता !