विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा PCMC
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : भारतीय जनता पक्षाने (BJP) विधान परिषदेच्या पाच जागांसाठी आज उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांच्या नावांचा समावेश आहे. भाजपने यादीत चार ओबीसी उमेदवारांना आणि एका दलित उमेदवाराला स्थान दिले आहे. pcmc
अमित गोरखे यांची ओळख
पिंपरी चिंचवड येथील रहिवासी अमित गोरखे हे भाजपच्या आयटी सेलचे काम पाहतात. ते एका दलित कुटुंबातून येतात. मातंग समाजाचे उच्चशिक्षित युवा नेतृत्व म्हणून गोरखे यांच्याकडे पाहिले जाते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांची लहानपणापासूनची नाळ जोडलेली आहे. त्यांनी एम.ए (सामाजिक शास्त्र), एमबीए (एचआर) पर्यंतचे उच्च शिक्षण घेतले आहे. (PCMC: Highly educated Amit Gorkhe will be MLA from Pimpri Chinchwad)
अमित गोरखे यांचे मूळ गाव श्रीगोंदा, अहिल्यानगर आहे. पण ते गेल्या 40 वर्षापासून पिंपरी चिंचवडचे रहिवासी आहेत.अमित गोरखे यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1980 रोजी झाला आहे. अमित गोरखे हे अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष देखील आहेत.
न्यूज पेपर विक्रेता, शिक्षण संस्थाचालक, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष असा त्यांचा आतापर्यंतचा प्रवास राहिलेला आहे.
त्यांच्या आई अनुराधा गोरखे या भाजपकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेत नगरसेविका होत्या. अमित गोरखे यांना भाजपने (BJP)आता विधानपरिषद सदस्य पदासाठीची उमेदवारी जाहीर केली आहे. pcmc
पिंपरी चिंचवड शहरातील नामवंत असलेल्या नोव्हेल शिक्षण संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत, त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात भरघोस काम केलं आहे. अनुसूचित जातीतील शैक्षणिक कार्यासाठी भारत सरकारचा राष्ट्रीय युवा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. 2014 मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. pcmc
अमित गोरखे यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिल्या मुळे पिंपरी चिंचवड शहरास चौथा आमदार मिळणार आहे.
हेही वाचा :
स्वस्त धान्य दुकानाचा परवानाचा हवाय ? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची
PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 2700 जागांसाठी भरती
ब्रेकिंग : राज्य सरकारचा मोठा निर्णय ; राज्यात लवकरच पाच फिरत्या अन्न तपासणी प्रयोगशाळा
ब्रेकिंग : पर्यटकांसाठी महत्वाची बातमी ; पर्यटनस्थळी नवीन सुरक्षा नियम लागू !
शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू; आजच करा अर्ज!
मोठी बातमी : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा
ब्रेकिंग : मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर ४ हजार ८३ मते मिळवून विजयी
मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी
मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या संदर्भात मंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्देश
धक्कादायक : लिफ्टमध्ये कुत्र्याला वॉकरने मारहाण; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद