Wednesday, June 26, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : निघोजे येथे असंघटित मजुर, वाहन चालकांसाठी आरोग्य शिबिर

PCMC : निघोजे येथे असंघटित मजुर, वाहन चालकांसाठी आरोग्य शिबिर

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : कुरणवस्ती, निघोजे येथे असंघटित कामगार वियेथील विध कंपन्यांमध्ये हमालीचे काम करत असतात, तसेच भारतभर कंपन्यानी उत्पादित केलेल्या इतर गाड्या व सुट्टे भाग घेऊन जाणारे वाहनचालक आणि वाड्या वस्तीवरील रोजंदारीवर काम करणारे गोरगरीब कामगार यांचेसाठी मानवी हक्क संरक्षण आणि जागृती पिंपरी चिंचवड या संस्थेच्या वतीने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. pcmc

या शिबीरामध्ये 150 असंघटित कामगार आणि वाहन चालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शुगर, बीपी, हाडाची ठिसूळता, रक्त वाहिन्यातील चरबीचे प्रमाण, डोळे तपासणी बरोबर आपल्याला कोणता भविष्यात आजार होऊ शकतो, याबद्दल डॉक्टरांनी त्यावरील उपचार व सल्ला देऊन, आहार कोणता घ्यायचा व घ्यावयाची काळजी याची माहिती दिल्याचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड  यांनी सांगितले. pcmc

निघोजे गावच्या सरपंच सुनीता येळवंडे शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी म्हणाल्या की गावाच्या वाड्या वस्तीवर आपण येऊन खूपच चांगले शिबिराचे आयोजन केले. महाराष्ट्रासह परराज्यातून पोटासाठी आलेला मजूर, वाहन चालकाचे आपल्या शिबिरामुळे त्यांच्या आजाराचे निदान झाले. आर्थिक परिस्थितीमुळे कामगार आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, यामुळे आम्ही असे शिबिर घेऊन एक चांगला आरोग्यसेवेचा उपक्रम राबवला आहे. free health checkup camp

यावेळी गुणवंत कामगार शंकर नाणेकर यांनी सांगितले.आम्ही पण मजूर अड्डे ,झोपडपट्टी तसेच कामगार वस्ती सारख्या भागात असे आरोग्य शिबिर यापुढेही घेणार असल्याचे गुणवंत कामगार शंकर नाणेकर यांनी यावेळी सांगितले. गुणवंत कामगार संगिता जोगदंड म्हणाल्या कि, सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत “आला पावसाळा आरोग्य सांभाळा” असा सल्ला देत मलेरिया, डेंगूपासून काळजी घेण्याची आव्हान केले. pcmc news

शिबिराचे उद्घाटन निघोजे गावच्या सरपंच सुनीता येळवंडे, मानवी हक्क संरक्षण जागृती शहराध्यक्ष अण्णा  जोगदंड, व्हिजश प्रमुख राजेश पाठक, गुणवंत कामगार शंकर नाणेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सरपंच सुनीता येळवंडे, शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, गुणवंत कामगार शंकर नाणेकर, मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा संगिता जोगदंड, व्हिजन ग्रुपचे राजेश पाठक, विविध विकास सोसायटीचे अध्यक्ष कैलास येळवंडे, शाळेचे मुख्याध्यापक सुखदेव मुंगसे, जिल्हा परिषद व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल आंद्रे, एचडीएफसी शाखा व्यवस्थापक सोपान नाणेकर, समर्थ पतसंस्थेचे सल्लागार प्रकाश जामदार, ग्रामपंचायत सदस्य हिरामण येळवंडे, प्रगतशील शेतकरी मारुती येळवंडे, उद्योजक नामदेव नाणेकर, वर्षा नाणेकर, डॉ. श्रदा सातकर, कोच नीता नाळवंडे, विनिता गायकवाड, नितीन नाळवंडे यांनी शिबिरात सहभाग नोंदवला.

शिबिराचे संयोजन अभय नाणेकर, रोहित रॉय, विनीत नाणेकर, राजेश कुमार लोधी ,गुणवंत कामगार शंकर नाणेकर यांनी केले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे पाय कार्यकर्त्याने धुतले, राजकारण तापले

NFL : नॅशनल फर्टिलायझर्स अंतर्गत 164 विविध पदांसाठी भरती

धक्कादायक : पाणीपुरी खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा, परिसरात खळबळ

मोठी बातमी : राहुल गांधी यांचा वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा

CDAC : प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत मोठी भरती, आजच अर्ज करा !

NHAI : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत भरती, आजच अर्ज करा !

युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती, आजच अर्ज करा !

बँक नोट पेपर मिल अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती, आजच अर्ज करा !

IAF : भारतीय हवाई दल अंतर्गत 304 पदांची भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय