Monday, June 2, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी व्हावी

इंटरनॅशनल हॉकर डे निमित्त ” चाय पे चर्चा” मध्ये नागरिक व फेरीवाल्यांची भर पावसात आग्रही मागणी (PCMC)


पिंपरी चिंचवड
– फेरीवाला हा समाजातील महत्त्वाचा घटक असून ऊन, वारा, पाऊसाची तमा न बाळगता कुटुंबियांचा उदरनिर्वाह करणारा फेरीवाला घटक सरकारी चुकीच्या धोरणामध्ये अडकलेला असून महानगरपालिका श्रीमंतांसाठी योजना राबवते मात्र फेरीवाला या गरीब घटकाकडे दुर्लक्ष जाणीवपूर्वक करत आहे पथ विक्रेता अधिनियम या कायद्याची अंमलबजावणी झाल्यास सर्व विक्रेते यांना न्याय मिळणार असून नागरिकांना सुद्धा त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. त्यामुळे या कायद्याची अंमलबजावणी करावी असा सूर चाय पे चर्चा मधील सर्वांचां होता व आग्रही मागणी होती व यावेळी असंख्य नागरिकांनी फेरीवाला घटकाला पाठिंबा देऊन हॉकर डे च्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. (PCMC)


नॅशनल हॉकर फेडरेशन,महाराष्ट्र हॉकर फेडरेशन,महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे आज शहरातील निगडी चौक, डांगे चौक, थरमॅक्स चौक, चिखली चौक ,पिंपरी काळेवाडी, भोसरी चौक मोरवाडी अशा विविध १९ चौकामध्ये चहा विक्रेत्यांनी ग्राहकांना व नागरिकांना मोफत चहा देऊन फेरीवाला कायदा व सामाजिक सुरक्षा बाबत चाय पे चर्चा करण्यात आली.

यावेळी नागरिकांनी भर पावसातही उत्स्फूर्त प्रतिसाद देत फेरीवाला घटकाला जलद गतीने न्याय मिळण्याची चर्चा केली तसेच फेरीवाला घटक हा आवश्यक त्यावेळेस आवश्यक तेथे जीवनावश्यक साधन वस्तू व सेवा उपलब्ध होत असल्यामुळे नागरिकांचा वेळ वाया जात नाही, तसेच अत्यंत स्वस्त दरामध्ये सेवा व वस्तू उपलब्ध होत असल्यामुळे फेरीवाला घटक गरजेचा आहे असेही मत नागरिकांनी व्यक्त केले. (PCMC)

यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, मनपा समिती सदस्य किरण साडेकर,किसन भोसले, सलीम डांगे सह लाला राठोड, अंकुश पवार, संदीप भोसले, मनोज पाटील, इरफान चौधरी, सुनील भोसले, राजेश माने, सलीम इनामदार, अनिल सूर्यवंशी, इकबाल शेख , मारुती सोनटक्के,चंद्रकांत चंपावत, जाधव, सुरेश देडे, सलीम शेख, रज्जाक शेख, राजू पठाण, आत्माराम पुलावळे इस्माईल चौधरी, हुसेन खान, सत्यम स्वामी, अंबालाल सुखवाल आदी उपस्थित होते. दिवसभर पिंपरी चिंचवड शहरातील सर्व विक्रेत्यांनी फेरीवाला दिवस अत्यंत आनंदात साजरा करत या उपक्रमामध्ये सहभागी घेतला भर पावसामध्ये सुद्धा लक्षनीय सहभाग होता.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles