Friday, June 20, 2025
---Advertisement---
---Advertisement---

पुण्यात हुंड्याच्या छळाला कंटाळून गर्भवती महिलेची आत्महत्या, लग्नाच्या ५ महिन्यातच टोकाचे पाऊल

Pune : पुण्यात हुंड्याच्या छळामुळे तरुणींच्या आत्महत्येच्या घटना समोर येत आहेत. अलीकडेच वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येच्या प्रकरणाने शहर हादरले असतानाच, आता हडपसर परिसरातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गर्भवती पूजा गजानन निर्वळ (वय २२ ) हिने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी पूजाच्या सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा : सलमान खानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला अटक)

---Advertisement---

Pune | सासरच्यांनी ५०,००० रुपये हुंड्याच्या स्वरूपात मागितले होते

पूजा निर्वळ हिचा विवाह पाच महिन्यांपूर्वीच गजानन निर्वळ याच्याशी झाला होता. हडपसर परिसरातील मांजरी बुद्रुक येथे ती सासरी राहत होती. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच पूजाला सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी त्रास दिला जात होता. सासरच्या मंडळींनी पूजाकडून ५०,००० रुपये हुंड्याच्या स्वरूपात मागितले आणि तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. या सततच्या त्रासाला कंटाळून पूजाने २७ एप्रिल २०२५ रोजी स्पाईन सिटी महाळूंगे येथे गळफास घेऊन आपले जीवन संपवले.  (हेही वाचा : शासकीय विश्रामगृहात कोट्यवधी रुपयांची रक्कम सापडल्याने खळबळ)

पोलिस कारवाई

---Advertisement---

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पूजाच्या माहेरच्या मंडळींनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी पूजाचा पती गजानन निर्वळ, सासू, सासरे आणि दीर यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ (ब), ३०६, ३४ आणि हुंडा प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.  (हेही वाचा : ‘ईडीने सर्व मर्यादा ओलांडल्या’ सर्वोच्च न्यायालयाचा ईडीवर संताप)

पुण्यात गेल्या काही दिवसांत हुंड्याच्या छळामुळे आत्महत्येच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येच्या प्रकरणानंतर अवघ्या काही दिवसांतच पूजाच्या आत्महत्येने समाजात खळबळ उडवली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी हुंडा प्रथेविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांमध्येही या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. अनेकांनी हुंडा प्रथेच्या निर्मूलनासाठी कठोर कायदे आणि सामाजिक जागरूकतेची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. (हेही वाचा : हायवेवर कार थांबून भाजप नेत्याचे महिले सोबत शारिरीक संबंध, व्हिडिओ व्हायरल)

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles