पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळाले. एक्झीट पोलचे सर्व अंदाज फोल ठरवत भाजपा परिवाराने विजयाची ‘हॅट्टट्रीक’ केली. हरियाणाच्या सूज्ञ जनतेचे आभार मानतो. (PCMC)
विकास आणि सुशासनाच्या राजकारणाचा हा विजय आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अशीच विजयाची पुनरावृत्ती होईल,असा विश्वास आहे. (PCMC)
काँग्रेस काळात जम्मू काश्मीरमध्ये दहशतीचे राज्य होते. काश्मीर खोऱ्यात आता लोकशाही पुन्हा एकदा जिवंत होणार आहे. दहशतीशिवाय लोकांनी आपले प्रतिनिधी निवडले आहेत. या अभूतपूर्व बदलांसाठी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री मा. श्री. अमित शाह यांच्यासह भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांचे व नेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन..!
अजेय भारत… अजेय भाजपा..!
– महेश लांडगे,
आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.