मराठवाडा मुक्ती संग्राम दिन नियोजन समिती’ आणि छावा मराठा युवा संघटनेचा उपक्रम (PCMC)
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : समाजातील श्रमिक, कष्टकरी, कर्मचारी अंध अपंग हॅंडीकॅप बंधू भगिनी अशा कामगारांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘अगोदर कष्टकरी कामगार वर्गाची दिवाळी, नंतर पाहू आपली’ या भूमिकेतून मराठवाडा मुक्ती संग्राम दिन नियोजन समिती’ आणि छावा मराठा युवा संघटनेचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील यांच्या वतीने सफाई कर्मचारी, पोस्ट ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना पोशाख व मिठाई, घरकाम करणाऱ्या महिलांना साडी आणि मिठाई वाटप वाटप करण्यात आली. (PCMC)
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/10/IMG-20241027-WA0001-1024x768.jpg)
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/10/IMG-20241027-WA0004-1024x576.jpg)
पिंपळे गुरव पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी, महापालिकेचे सफाई कामगार, घरकाम करणाऱ्या महिला, घंटागाडीवर काम करणाऱ्या ७०० पुरुष व महिला आदी सर्वांना साडी, कपडे व मिठाई वाटप करण्यात आली.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/10/IMG-20241027-WA0003-960x1024.jpg)
यावेळी छावा मराठा युवा संघटनेचे अध्यक्ष धनाजी येळेकर पाटील, युवराज माने, अभिमन्यू पवार, प्रकाश इंगोले अण्णा जोगदंड संतोष भोरे, अण्णा मोरे, सूर्यकांत कुरुलकर , बळीराम माळी, सखाराम वालकोळी अनिता पांचाळ , वामन भरगंडे, अनिस पठाण, संजय सूर्यवंशी, संदीप कोराळे दिनेश पवार , कॅप्टन बालाजी पांचाळ बाळासाहेब काकडे, प्रवीण कदम, शंकर तांबे, किशोर आटरगेकर, बालाजी पांचाळ आदी उपस्थित होते.
याबाबत धनाजी येळकर यांनी सांगितले, की आपल्या माणसांसाठी वर्षातील सर्वात मोठा आनंद वाटता येणारा सण दिवाळी आहे. छावा संघटना विविध घटकांना सोबत घेऊन नेहमीच दिशादर्शक आणि सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवत आहे.
प्रथम कष्टकऱ्यांची दिवाळी साजरी झाली पाहिजे, या भावनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.
![whatsapp link](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/whatsapp.gif)
![google news gif](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/google-news-GIF.gif)
हेही वाचा :
कॉँग्रेसची दुसरी यादी जाहीर ; वाचा कुणा कुणाला मिळाली संधी
आशा व गटप्रवर्तकांना निवडणूक कामाचा भत्ता देण्याची मागणी
जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ
लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर
पुण्यात सोन्याने भरलेला ट्रक सापडला, सर्वत्र एकच खळबळ
मविआतील बड्या नेत्यांविरोधात अजित पवारांचा मोठा डाव
अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर, झिशान सिद्दीकींनाही मिळालं तिकीट
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; मोठ्या शक्तिप्रदर्शनासह, दिग्गज नेत्यांचे अर्ज दाखल
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; महाविकास आघाडीचा मोठा प्लॅन
दाना’ चक्रीवादळाचा धडाका ; 56 पथके हाय अलर्टवर, महाराष्ट्रात काय परिणाम?
पिंपरी चिंचवडमध्ये दुर्दैवी दुर्घटना ; तीन मजुरांचा जागीच मृत्यू
इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमने-सामने?
अजित पवार गटाची यादी जाहीर, वाचा कुणा कुणाला मिळाली संधी
दाना चक्रीवादळ आज धडकण्याची शक्यता, महाराष्ट्रावर होणार का परिणाम?
मनसेची दुसरी उमेदवारी यादी जाहीर; राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात
शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर; मुख्यमंत्री शिंदेंसह अनेक उमेदवारांची नावे घोषित
भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर – 99 जागांसाठी उमेदवारांची नावे घोषित