पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. pcmc news
यावेळी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उप आयुक्त अण्णा बोदडे , विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
यानंतर निगडी येथील महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. निगडी येथील कार्यक्रमास उप आयुक्त अण्णा बोदडे , विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता नितीन देशमुख , जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातर्फे डॉ. शंकर मोसलगी यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. pcmc news
रक्तदान शिबिरासाठी डॉ. गणेश लांडे, आम्रपाली गायकवाड, सुनित आवठे, गीता चव्हाण, स्वप्नील नांदे, शिवाजी सोळंकी, राम येनेकर, वैजयंता धनावडे, हरीचंद्र बेहेरे आदींचे सहकार्य लाभले.


हे ही वाचा :
प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील शरद पवार यांचे मोठे विधान
राज्यात ११ मतदारसंघात अंदाजे ६१.४४ टक्के मतदान
बारामतीत पोलिसांच्या ‘बंदोबस्तात’ पैशांचा पाऊस ? रोहित पवारांचे गंभीर आरोप
‘EVM’ मशीनच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्यास अटक
TMC : टाटा स्मारक हॉस्पिटल येथे भरती
मोठी बातमी : दिंडोरीतून माकपचे उमेदवार जे पी गावित यांचा उमेदवारी अर्ज मागे