Monday, July 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : शासकीय जिल्हास्तरीय शालेय क्रिडा स्पर्धा २०२४-२५ नियोजन सुरू

PCMC : शासकीय जिल्हास्तरीय शालेय क्रिडा स्पर्धा २०२४-२५ नियोजन सुरू

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : शासकीय जिल्हास्तर शालेय क्रिडा स्पर्धा २०२४-२५ यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व क्रिडा अधिकारी, क्रिडा पर्यवेक्षक आणि क्रिडा शिक्षकांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. यासाठी शहरातील विविध खाजगी शाळांमधील क्रिडा पर्यवेक्षक तसेच क्रिडा शिक्षकांचेही सहकार्य तितकेच महत्वाचे असून त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या सूचना, प्रतिक्रिया विचारात घ्याव्यात. PCMC

तसेच या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त खेळाडूंना आणि संघांना सहभागी करून घेण्यासाठी महापालिका तसेच खाजगी शालेय स्तरावर विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व पटवून द्यायला हवे, असे मत अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी व्यक्त केले. pcmc

पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे शासकीय जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा २०२४-२५ च्या अनुषंगाने आयोजन व नियोजन सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे बोलत होते.

या सभेस जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, सहाय्यक आयुक्त पंकज पाटील, प्रशासन अधिकारी परशुराम वाघमोडे, क्रीडा अधिकारी अनिता केदारी, ज्येष्ठ क्रिडा पर्यवेक्षक जयश्री साळवी, क्रिडा पर्यवेक्षक बलराम शिंदे, आहारतज्ञ सोनिया लुथ्रा तसेच तालुका क्रिडा अधिकारी, महापालिका आणि खाजगी विद्यालयांचे प्राचार्य, क्रीडा पर्यवेक्षक, क्रीडा शिक्षक, शालेय प्रतिनिधी उपस्थिती होते.

अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे म्हणाले, माणसाच्या भौतिक प्रगतीसोबत कला, क्रीडा या गुणांचा देखील विकास झाला पाहिजे. लहानपणापासूनच शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कला आणि क्रिडा विकासासाठी भरीव काम करत आहे.

यामुळे पिंपरी चिंचवड शहरात असलेल्या क्रिडाविषयक पायाभूत सुविधांमध्ये दिवसेंदिवस प्रगती होताना दिसत आहे. महापालिकेने पूर्वीपासूनच खेळांच्या विविध प्रकारांसाठी योगदान देऊन नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या आहेत. त्यामध्ये कबड्डीचे मैदान, टेनिस आणि बॅडमिंटन हॉल्स, जलतरण तलाव, हॉकीचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान, आवश्यक खेळाचे साहित्य आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. खाजगी शाळांनीही शहरात विविध ठिकाणी होणाऱ्या क्रिडा स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कलागुणांना वाव द्यावा. pcmc

सहाय्यक आयुक्त पंकज पाटील म्हणाले, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शासकीय जिल्हास्तर शालेय क्रिडा स्पर्धेचे आयोजन ऑगस्टमध्ये करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या क्रीडाविषयक गुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्यातील क्रिडाविषयक नैपथ्य जोपासणे हे या स्पर्धेमागचे उद्दिष्ट आहे.

अभ्यासासोबत विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक विकास होणेही गरजेचे आहे आणि यामध्ये शाळांमधील क्रिडा शिक्षकांची आणि पर्यवेक्षकांची महत्वाची भूमिका आहे. सर्व क्रिडा अधिकारी, शिक्षक, पर्यवेक्षक, कर्मचारी यांच्या समन्वयाने आणि सहकार्याने यावर्षीही ही स्पर्धा उत्साहात पार पाडण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. त्यामध्ये खाजगी शाळांच्या क्रिडा शिक्षकांनीही सहकार्य करावे आणि आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना ओळखून ते ज्या खेळात अग्रेसर आहेत त्या खेळामध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. pcmc

यावेळी जिल्हा क्रिडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी स्पर्धेच्या नियोजनामध्ये येणाऱ्या अडचणी, आवश्यक सोयीसुविधा, खेळाडूंचा सहभाग नोंदविण्याची प्रक्रिया, खेळाडूंना देण्यात येणाऱे प्रशिक्षण, स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना शालेय जीवनात होणारे फायदे, बक्षिसाची रक्कम, शिष्यवृत्ती, नोकरीमध्ये आरक्षण, शासनाकडून विविध खेळांसाठी देण्यात येणारे मानधन आणि सोयीसुविधा याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच आहारतज्ञ सोनिया लुथ्रा यांनी खेळाडूंच्या दैनंदिन आहाराबद्दल माहिती दिली. pcmc

सभेचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त पंकज पाटील यांनी तर सुत्रसंचालन ज्येष्ठ क्रिडा पर्यवेक्षिका जयश्री साळवी यांनी केले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

जगातील पहिली CNG बाईक प्रदूषणमुक्त भारत ध्येय साध्य करेल – नितीन गडकरी

नाणेघाट : इतिहासाची आणि नैसर्गिक सौंदर्याची संगमभूमी

मोठी भरती : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत भरती; पगार 64480 पर्यंत

ब्रेकिंग : मुख्याध्यापक नियुक्तीसाठी पटसंख्येचा निकष बदलणार ?

गावठी दारू तयार करणाऱ्या १० हातभट्ट्यांवर छापा; २ लाख १७ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त

AIASL मार्फत विविध पदांच्या 3256 जागांसाठी मेगा भरती

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील झिका विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक नियमावली जाहीर

धक्कादायक! अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने कॉलेजच्या टॉयलेटमध्ये दिला बाळाला जन्म

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय