Monday, June 2, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : सामाजिक कार्यकर्ते किशोर थोरात यांना पितृशोक

पिंपरी चिंचवड – येथील सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ चे पुणे जिल्हा अध्यक्ष तसेच महा पोलीस मित्र संघ चे पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात यांना गुरुवार दिनांक २९ मे रोजी पितृशोक झाला. (PCMC)

किशोर थोरात यांचे वडील अण्णासाहेब विश्वनाथ थोरात यांचे नुकतेच पुणे येथे वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले तर ते ७८ वर्षाचे होते. त्यांचा अंत्यविधी मूळ गावी म्हणजेच उक्कलगाव ता श्रीरामपूर जि अहिल्यानगर येथे दिनांक २९ मे रोजी रात्री 11 वा प्रवरतीरी करण्यात आला तर दहाव्याचा विधी शनिवार दिनांक ७ जून रोजी मूळ गावी होणार आहे.

आणासाहेब थोरात हे प्रवरा सहकारी कामगार सोसायटी चे माजी उपाध्यक्ष होते तर पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यामध्ये त्यांनी २५ वर्ष नोकरी केली आणि २००७ साली त्यांची सेवा निवृत्ती झाली होती. तर त्यांची प्रवरा परिसरात थोरात मामा या नावाने ओळख होती. (PCMC)

वडील गेल्याने किशोर थोरात यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून वडिलांच्या मागे मुलगा किशोर थोरात,सून व दोन नात असा परिवार आहे.
किशोर थोरात हे आण्णासाहेब थोरात याचे दत्तक पुत्र असून त्यांचे कुटुंब पिंपरी चिंचवड येथे सध्या स्थायिक आहे. (PCMC)

त्यांच्या या दुःख मध्ये त्यांचे आप्तेष्ट,नातेवाईक,मित्र मंडळी,त्यांच्या नोकरीत रॉबर्ट शॉ कंपनीत असलेला सहकारी परिवार, सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ, महा पोलीस मित्र संघ, आधार शैक्षणिक संस्था पुणे, अनंतकोटी श्री स्वामी समर्थ सेवामार्ग परिवार, समर्थ सोशल फौंडेशन कोल्हापूर आदी संस्था सहभागी आहेत.
सर्वांनी संदेशपूर्व श्रद्धांजली व्यक्त करत दुःखातून सावरण्याची ताकत ईश्वर थोरात कुटुंबाला देवो अशी इच्छा व्यक्त केली.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles