एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत (PCMC)
पिंपरी चिंचवड /क्रांतीकुमार कडुलकर – आर्किटेक्ट हा लोकांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करणारा सूत्रधार असतो. वास्तूशास्त्राचे शिक्षण घेताना नवनवीन संकल्पना, तंत्रज्ञानातील कौशल्य आत्मसात करा. इतरांशी स्पर्धा करू नका. अभ्यासाचा मनावर ताण येणार नाही याची काळजी घ्या. सकारात्मक विचार करा. पालक, शिक्षक, वर्गमित्र यांच्याशी संवाद साधा. (PCMC)
निसर्ग ही एक साखळी असून आपण या साखळीतील एक भाग आहोत हे लक्षात ठेवा. चांगले कार्य करत राहिल्यास तुमच्या आयुष्यात चांगले दिवस, चांगले कार्य हातून घडेल. त्यासाठी उत्तम मार्गदर्शक, अनुभवी गुरूंची आवश्यकता असते. गुरुंच्या मार्गदर्शनाखाली काम करा. तुम्ही नक्की यशस्वी वास्तूविशारद व्हाल, असे मार्गदर्शन डीप्रूट्स डिझाईन आणि लिव्हिंग प्रॉडक्ट्स प्रा. लि. च्या संस्थापक प्रिन्सिपल आर्किटेक्ट राजलक्ष्मी अय्यर यांनी विद्यार्थ्यांना केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित (पीसीईटी) एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ॲण्ड डिझाईनच्या २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आणि कार्यशाळा सोमवारी (२३ सप्टेंबर) निगडी प्राधिकरणातील महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती.
यावेळी प्रभारी प्राचार्या शिल्पा पाटील, प्रा. शिरीष मोरे, लक्ष्मण तोरगळे, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
शिल्पा पाटील यांनी महाविद्यालयाने आजवर केलेल्या कार्याचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम, स्पर्धा आयोजित केल्या जातात, वास्तूकलेची माहिती व्हावी यासाठी भारतातील विविध ठिकाणी भेटी दिल्या जातात. यासाठी पीसीईटी संचालक मंडळाचे नेहमी सहकार्य, मार्गदर्शन लाभते असे सांगितले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
व्दितीय वर्षाचे विद्यार्थी फाल्गुनी पटेल आणि आदित्य काळे यांनी सुत्रसंचालन केले. आभार आर्किटेक्ट नीलिमा भिडे यांनी मानले.
PCMC : आर्किटेक्ट स्वप्न साकार करणारा सूत्रधार – राजलक्ष्मी अय्यर
संबंधित लेख