Monday, December 23, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : महात्मा फुलेनगरच्या प्रवेशद्वारावर घाणीचे साम्राज्य, संसर्गजन्य रोगांची नागरिकांमध्ये भीती

PCMC : महात्मा फुलेनगरच्या प्रवेशद्वारावर घाणीचे साम्राज्य, संसर्गजन्य रोगांची नागरिकांमध्ये भीती

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : ‘स्वच्छ भारत…स्वच्छ शहर’चा नारा देत आपले शहर स्वच्छ ठेवण्याकडे शासन- प्रशासनाकडून आवाहन करण्यात येऊन शहर स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे. मात्र, पिंपरी चिंचवड शहराची वाटचाल ही तेवढ्याच झपाट्याने अस्वच्छतेकडे होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (PCMC)

शहरात ठिकठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य यामुळे भविष्यात साथीच्या रोगांचे प्रसार रोखता रोखता दुसऱ्याच आजाराने तोंड वर काढल्यास यास जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

मनपा स्वच्छतेवर कितीतरी खर्च करते? मात्र, पिंपरी चिंचवड शहरातील अनेक भागातील नाल्या या घाणीने तुडूंब भरलेल्या असून ते घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे. तर काही ठिकाणी कचरा हा अस्ताव्यस्त पसरून रोगाला आमंत्रण देण्याचं काम करीत आहे. शहर स्वच्छतेवर भर असल्याची ओरड स्थानिक प्रशासनाकडून केली जात असली तरी शहरात अनेक ठिकाणी असलेली घाण व कचरा हे स्वच्छतेबाबत किती जागृत आहे हे दाखवून देते. (PCMC)

सध्या वेगवेगळ्या साथीच्या रोगांच्या विषाणूनी सर्वत्र थैमान घातले असून नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे. नागरिक विविध रोगापासून बचाव करण्यासाठी घंटागाडी वरून संदेश सांगण्यात येणाऱ्या उपायांचे नियोजन करण्यावर गांभीर्याने भर देत आहेत.

दैनंदिन स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज आहे.

पेठ क्रमांक १८ येथील महात्मा फुले नगर, चिंचवड हे पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने अत्यंत सुसज्ज पद्धतीचे सामान्य नागरिकांसाठी घरे बांधले, परंतु महानगरपालिकेने या परिसरात नागरी सुविधा देण्यात व स्वच्छतेला प्राधान्य देण्यात नेहमीच अपयशी होताना दिसते.

अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकाम करून विनापरवाना व्यवसाय केला जातो. त्यातून नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्याची उघडपणे चर्चा सुद्धा करू शकत नाही, कारण सर्वसामान्य नागरिक हा धन दांडग्यांशी सामना करू शकत नाही. नागरिक आपले व्यथा प्रशासनासमोर मांडण्याची हिंमत सुद्धा करीत नाही. केला तरी कारवाई होत नाही. नागरिक संतप्त आहेत, प्रशासनाने दैनंदिन स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज आहे.

शिवानंद चौगुले (सामाजिक कार्यकर्ते)

संबंधित लेख

लोकप्रिय