Thursday, April 3, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : अग्रसेन महाराजांचा पुतळा उभारणी व उद्यान सुशोभिकरण मागणीसाठी आगरवाल बांधवांकडून निदर्शने

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर : निगडी येथील भक्ती शक्ती शेजारी असलेल्या अग्रसेन महाराजांचा पुतळा आणि उद्यान सुशोभिकरण त्वरित करावे या मागणीसाठी आज आगरवाल बांधवांनी निगडी येथील टिळक पुतळ्यासमोर काळे झेंडे दाखवून निदर्शने केली. माजी उपमहापौर राजू मिसाळ, शैलजा मोरे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, माजी नगरसेवक अमित गावडे, सचिन चिखले यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला.

श्री अग्रसेन ट्रस्ट चिंचवड प्राधिकरणचे अध्यक्ष सुनील रामेश्वर अगरवाल, पुतळा समितीचे अध्यक्ष सुनील जयकुमार आगरवाल, कार्याध्यक्ष सुभाष बन्सल, सचिव सत्पाल मित्तल, सीए के एल बन्सल, गौरव आगरवाल, अशोक बन्सल, वेदप्रकाश गुप्ता, वेदप्रकाश मित्तल, जोगिंदर मित्तल, आशिष गर्ग, विकास गर्ग, संदीप गुप्ता, विशाल मित्तल, धर्मेंद्र आगरवाल, तरुण मित्तल, सु. अग्रवाल, अनिल दयाराम अग्रवाल, नरेश जैन, आनंद अग्रवाल, रजनी अग्रवाल, रेणू मित्तल, लता अग्रवाल, सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर, सुधीर आगरवाल आदी उपस्थित होते.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील आगरवाल म्हणाले कि, पालिकेने २ फेब्रुवारी २०२२ च्या बैठकीमध्ये अग्रसेन महाराजांचा पुतळ्याची उभारणी करून उद्यानाचे सुशोभीकरण करण्याचा ठराव मंजूर झालेला आहे. मात्र पालिकेने अद्याप काम सुरू केले नाही. या कामाला गती यावी यासाठी आम्ही आज पालिकेला निवेदन दिले आहेत. आज आमच्या समाजाचे शहरात लाखो नागरीक आहे. आगरवाल समाजाचे शहराच्या विकासामध्ये आज योगदान आहे. समाज कार्यात अग्रेसर असतो. सर्व समाजाला भूखंड दिलेत मात्र आम्हाला अद्याप दिले नाही.

पुतळा समिती अध्यक्ष सुनील ज.अगरवाल म्हणाले कि, आम्ही वेळोवेळी कर तर भरतोच औद्योगिक व सामाजिक क्षेत्रात पुढे असतोच. तरी पालिका या पुतळ्याकडे दुर्लक्ष करीत आहे. निगडी येथे उद्यानात उद्यानाचा विकास करावा आणि भव्य पुतळा उभारण्यात यावा. यासाठी पालिकेने दिरंगाई करू नये.असे मत मांडले.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles