पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : अधिकाधिक लाभार्थींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ देण्यासाठी महापालिकेच्या वतीने सुरु असलेली अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक वेगवान करत योजना प्रभावीपणे राबवावी, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या. (PCMC)
महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी तसेच या योजनेचा लाभ महिलांना थेट लाभ हस्तांतरण पद्दतीने देण्यासाठी राज्यशासनाच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. (pcmc)
या योजने अंतर्गत पात्र महिला लाभार्थींचे अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्दतीने भरण्याची प्रक्रिया महापालिकेच्या वतीने विविध ठिकाणी सुरु आहे. त्याबाबतची आढावा बैठक अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या कक्षात पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे, उप आयुक्त निलेश भदाणे, राजेश आगळे, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण, प्राचार्य शशिकांत पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, अंकुश जाधव, सीताराम बहुरे, किशोर ननावरे, उमेश ढाकणे, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, प्रशासन अधिकारी गोरखनाथ लिमण,माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सुधीर बोराडे, यांच्यासह अंगणवाडी पर्यवेक्षिका उपस्थित होत्या.
अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत पिंपरी चिंचवड महापालिका राज्यात आघाडीवर असून अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिकाधिक वेगवान करावी, तसेच तळागळातील पात्र महिलांना या योजनेचा लाभ देण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिलांनी प्रयत्न करावे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आपल्या आधिपत्याखालील सर्व संबंधित यंत्रणेच्या कार्याचा आढावा घेऊन नियमित अहवाल सादर करावे, असेही जांभळे पाटील म्हणाले.
हेही वाचा :
मोठी भरती : भारतीय टपाल विभागात 44228 पदांची भरती; पात्रता 10वी पास
भावडांसोबत खेळताना दोरीचा फास लागून 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू
ब्रेकिंग : शाहरुख खान उपचारासाठी अमेरिकेला रवाना होणार, वाचा कशाचा आहे त्रास !
मनू भाकर-सरबज्योत सिंग जोडीने इतिहास रचला, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले
वायनाडमध्ये भीषण भूस्खलन ; ४५ ठार, शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
‘त्या’ प्रकरणात अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
ओलंपिकमध्ये बलराज पंवारचे चमकदार प्रदर्शन, एकल स्कल्स हीटमध्ये चौथा क्रमांक
१० मीटर एअर रायफल मिश्रित स्पर्धेत भारताला धक्का
Typhoon : ‘गेमी’ चक्रीवादळ; फिलिपाईन्स, तैवान चीनमध्ये तडाखा
कोल्हापूर शहरात महापूर – 5,800 लोक सुरक्षित स्थळी
गुजरातमधून तडीपार झालेल्यांनी… शरद पवार यांचे अमित शाहांना चोख प्रत्युत्तर