Tuesday, July 2, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : योग दिनाच्या कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे - राहुल महिवाल

PCMC : योग दिनाच्या कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे – राहुल महिवाल

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : महापालिकेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त (International Yoga Day 2024) शहरातील विविध भागात १३ ठिकाणी योगा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, २१ जून रोजी सकाळी ६.३० वाजता शहरातील विविध बॅडमिंटन हॉल येथे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून योग दिन उत्साहात साजरा करावा, असे आवाहन आयुक्त राहुल महिवाल यांनी केले आहे. pcmc

२१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन संपूर्ण जगभर साजरा करण्यात येतो. त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध भागात क्षेत्रीय कार्यालयनिहाय योगा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. pcmc

त्यामध्ये “अ” क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात निगडी प्राधिकरण येथे मदनलाल धिंग्रा मैदान बॅडमिंटन हॉल आणि नेताजी सुभाषचंद्र बोस बॅडमिंटन कोर्ट येथे योगा कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले आहे.

“ब” क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात चिंचवड येथील फत्तेचंद जैन स्कुल शेजारील पवनानगर बॅडमिंटन हॉल आणि पागे तालीम समोरील विठोबा गावडे सभागृह येथे योगा कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे.

“ई” क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रात भोसरीतील आदर्श शाळेजवळील दिघी रोड परिसरातील बॅडमिंटन हॉल आणि गव्हाणे वस्ती बॅडमिंटन हॉल येथे योगा कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले आहे.

“फ” क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात चिंचवड मधील कृष्णानगर येथील स्वामी विवेकानंद क्रीडा संकुल, निगडीतील यमुनानगर येथील छत्रपती शिवाजी महाराज बॅडमिंटन हॉल येथे योगा कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले आहे.

“ग” क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत पिंपरीगाव येथील कापसे आळीतील काशिबा शिंदे बॅडमिंटन कोर्ट आणि थेरगाव येथील डांगे चौकातील मथाबाई डांगे बॅडमिंटन हॉल या ठिकाणी योगा कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे.

“ह” क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात संत तुकारामनगर येथील संत तुकाराम पुतळ्यासमोरील सरदार वल्लभभाई पटेल बॅडमिंटन हॉल, पिंपळे गुरव येथील काटेपुरम चौकातील कै. काळूराम जगताप बॅडमिंटन हॉल आणि नवी सांगवी येथील पी. डब्ल्यू. डी. मैदानातील नवी सांगवी बॅडमिंटन कोर्ट येथे योगा कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले आहे. pcmc

पिंपरी चिंचवड महापालिका आणि योग विद्या धाम संस्था, पिंपरी यांच्या सहकार्याने ‘आंतरराष्ट्रीय योग दिन २०२४’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : वाराणसीत पंतप्रधान मोदींच्या कारवर चप्पल फेक ?

मोठी बातमी : हज यात्रेत 550 जणांचा उष्मघाताने मृत्यू !

मोठी बातमी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १७ व्या हप्त्याचे वितरण

ब्रेकिंग : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध जागांसाठी मोठी भरती

वन विभाग अंतर्गत भरती; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

ब्रेकिंग : एक रुपयात पीक विमा भरण्यास सुरुवात, असा करा अर्ज !

धक्कादायक : पाणीपुरी खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा, परिसरात खळबळ

ब्रेकिंग : महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे पाय कार्यकर्त्याने धुतले, राजकारण तापले

NFL : नॅशनल फर्टिलायझर्स अंतर्गत 164 विविध पदांसाठी भरती

धक्कादायक : पाणीपुरी खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा, परिसरात खळबळ

मोठी बातमी : राहुल गांधी यांचा वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय