विकास अनाथ आश्रम, चिखली येथे संगणक आणि आवश्यक अंतर्वस्त्रे वितरण समारंभ (PCMC)
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : वुई टुगेदर फाउंडेशन, पिंपरी चिंचवड या सेवाभावी संस्थेच्या वतीने सोनावणे वस्ती, चिखली येथील विकास अनाथ आश्रम येथील ५५ मुलामुलींना (orphan children) आवश्यक अंतर्वस्त्रे आणि संगणक प्रदान करण्याचा कार्यक्रम (दि. १ डिसेंबर) आयोजित करण्यात आला होता. (PCMC)
काळेवाडी येथील दानशूर सामाजिक कार्यकर्ते श्री. रविंद्र इंगळे यांनी एकूण ५५ मुलामुलींसाठी प्रत्येकी दोन प्रमाणे ११० अंत्रावस्त्रे तसेच अनिल पोरे, सीता केंद्रे व जयंत देशमुख यांनी प्रत्येकी एक संगणक सेट मुलांच्या सॉफ्ट स्किल प्रशिक्षणासाठी प्रदान केला.
तसेच चिंचवड येथील दुकानदार श्री अतुल सेठ यांनी या मुलांना नवीन शर्टस दिले.


या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. कैलास जोरूले, अस्थिरोग तज्ज्ञ, बिर्ला हॉस्पीटल, डॉ. अमृता सहस्रबुधे – जोरूले उपस्थित होते.
अनाथ मुलामुलींना स्वावलंबी बनविणे हे युगांधरासारखे कार्य आहे – रविंद्र इंगळे
या कार्यक्रमात काळेवाडी येथील दानशूर सामाजिक कार्यकर्ते श्री. रविंद्र इंगळे यांनी विकास अनाथ आश्रमातील अनाथ मुलांची माहिती घेतली, ते म्हणाले की, मातृ पितृ छत्र हरवलेल्या गरीब मुलांना अनाथाश्रम चालवणे, त्यांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरणात संगोपन करत सज्ञान करण्याचे काम गेली १६ वर्षे केले जात आहे, हे अवघड कार्य आहे, एखाद्या वसतिगृहासारखे येथील वातावरण आहे.
भगवान श्री कृष्णाला युगंधर म्हणतात, त्याने सभ्य निर्मिती साठी सामाजिक तत्त्वज्ञान सांगितले आहे, येथे माऊली हारकळ युगंधरा सारखे काम करत आहेत, आम्ही वुई टुगेदर फाउंडेशनच्या (WE TOGETHER FOUNDATION) माध्यमातून आमची सामाजिक बांधिलकी म्हणून येथे आवश्यक ते दान करण्याची संधी मिळाली, याचा आनंद होत आहे.
आश्रमातील मुलांना वैद्यकीय सेवा,गोळ्या औषधांची मदत करू – डॉ. कैलास जोरूले
बिर्ला हॉस्पिटलचे अस्थिरोग तज्ञ
डॉ. कैलास जोरूले यांनी मुलांना एक बॉक्स सफरचंदचे (apples) वितरण केले.
यावेळी ते म्हणाले की, राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील अनाथ मुले येथे आहेत,साथीच्या आजार, तसेच अन्य आरोग्य सेवेसाठी व्हिटॅमिन युक्त गोळ्या, औषधे किंवा अन्य उपचार यासाठी आम्ही मदत करू. डॉ. कैलास जोरूले यांनी आश्रम संचालक माऊली हारकळ यांच्या कार्याचे कौतुक केले.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सोनाली मन्हास यांनी केले, प्रस्ताविक माऊली हारकळ यांनी केले, संस्थेचे अध्यक्ष सलीम सय्यद यांनी वुई टुगेदर फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली. मंगला डोळे – सपकाळे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमात पाहुणे आणि पदाधिकारी यांचे हस्ते आवश्यक कपडे, संगणक वितरण करण्यात आले.
वुई टुगेदर फाउंडेशनचे जयंत कुलकर्णी, सरिता जयंत कुलकर्णी, मधुकर बच्चे, सलीम सय्यद, मैमुना सय्यद, साधना बापट, श्रीनिवास जोशी, विलास गटणे, दिलीप चक्रे, अनिल पोरे, धनराज गवळी,अतुल शहा, रविंद्र इंगळे, रोहित वैद्य, के. रंगाराव, अर्जुन पाटोळे,जी आर चौधरी, क्रांतीकुमार कडुलकर, दिलीप पेटकर, दारासिंग मन्हास, मंगला सपकाळे आदी पदाधिकारी, सदस्य यावेळी उपस्थित होते.