Sunday, December 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : स्व.सोपान दादा खरबडे यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबीर, अंधः मुलांना...

PCMC : स्व.सोपान दादा खरबडे यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबीर, अंधः मुलांना अन्नदान

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : भोसरी येथे खरबडे यांच्या स्मरणार्थ खरबडे युथ फाऊडेशनच्या वतीने ” रक्त दान हेच श्रेष्ठ दान ” समजून सिरोजिकल इन्स्टिट्यूट ब्लड सेंटर पुणे या रक्तपेढीला 75 रक्त बाटल्यांचे संकलन करून देण्यात आले. आपल्याला समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि ते दिले पाहिजे या भावनेतून पांजरपोळ येथील अंधःशाळेतील ८० विद्यार्थांना अन्नदान करण्यात आले. (PCMC)

त्यानंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गोशाला ट्रस्ट येथे गोमातेला १० क्विंटल चाऱ्याचे वाटप करण्यात आले त्यानंतर श्री.स्वामी समर्थ विद्यामंदिर लांडेवाडी येथे १०० विद्यार्थांना शालेय दफ्तर वाटण्यात आले. विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.


यावेळी सर्व कार्यकर्ते भावूक झाल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्यांना आदरांजली वाहिली. मित्रपरिवारा बरोबरच  खरबडे कुटुंबही सामाजिक उपक्रमात सहभागी झाले होते. (PCMC)

यावेळी सोहम लोंढे, ओम बेलुरे, अनिकेत शेटे, शुभम गावडे, गणेश दासर,अक्षय काळे, प्रेम गव्हाळे, रोशन चव्हाण, सागर दुनघव, स्वप्निल जोंजाळ, परशुराम नवलेकर, लक्ष्मण तोरणगी, प्रेम पवार, ओम तापकीर, अजय दुनघव, निखिल पठारे, ऋत्विक भोसले, अजय पाटील, उमेश कड, प्रफुल्ल गव्हाळे, निखिल चव्हाण, लोकेश माने यांनी परीश्रम घेतले.

संबंधित लेख

लोकप्रिय