Monday, December 23, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : महानगरपालिकेच्या स्वच्छ भारत अभियानासाठी सहा ब्रँड अँबेसिडर नियुक्त

PCMC : महानगरपालिकेच्या स्वच्छ भारत अभियानासाठी सहा ब्रँड अँबेसिडर नियुक्त

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : महानगरपालिकेच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ करिता पाच ब्रँड अँबेसिडर नियुक्त करण्यात आले असून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. PCMC

पिंपरी चिंचवड शहराला देशातील सर्वात सुंदर शहर बनविण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. स्वच्छ भारत अभियान पिंपरी चिंचवड शहरांमध्ये राबविण्यात येत आहे. याकरिता लोकसहभाग महत्त्वाचा आहे. त्यासाठी आम्ही आमची जबाबदारी पार पाडू असे नवनियुक्त ब्रँड अँबेसिडर व जेष्ठ नागरिक यशवंत कण्हेरे यांनी सांगितले. PCMC

स्वच्छ भारत सर्वेक्षण 2024 अंतर्गत स्वच्छतेची लोक चळवळ व्यापक करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान ब्रँड अँबेसिडर नियुक्त करण्यात आले आहे. यामध्ये महात्मा फुले नगर येथील ज्येष्ठ नागरिक यशवंत गंगाराम कण्हेरे, पूजा शेलार, संगीता किशोर जोशी-काळभोर, मनोज वसंत देवकर व आदिती निकम यांना ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.


स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छते विषयक मोहिमेमध्ये त्यांनी सहभागी व्हावे अशी विनंती मनपाने केली आहे. याबाबतचे आदेश यशवंत डांगे (सहाय्यक आयुक्त, आरोग्य विभाग, स्वच्छ भारत अभियान पिंपरी चिंचवड महानगरपालिका) यांनी 4 जूनला काढले आहेत. ब्रँड अँबेसिडर पदी नियुक्तीचे पत्र यांना प्राप्त झाले आहेत.

ज्येष्ठ समाज कार्यकर्ते, कर्मयोगी संत गाडगेबाबा जागृती मंचचे अध्यक्ष यशवंत कण्हेरे सध्या आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त दिंडीत सहभागी असल्याने काल लोणंद मुक्कामी त्यांचा ‘श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान’ च्या वतीने सन्मान करण्यात आला.

सन्मानाला उत्तर देताना म्हणाले, हा सन्मान माझा एकट्याचा नव्हे तर स्वच्छता अभियानात सहकार्य करणारे, सहभागी होणारे सर्व कार्यकर्त्यांचे व आरोग्य सेवकांचे आहे.

शिवानंद चौगुले यांनी प्रास्ताविक केले व रामचंद्र कापसे ज्येष्ठ दांपत्याच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

संबंधित लेख

लोकप्रिय