पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : चाकण एमआयडीसी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांच्या पुढाकाराने चाकण एमआयडीसी उद्योजक संघटनेचा वर्धापन दिन विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. PCMC
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील चाकण एमआयडीसी उद्योजक संघटनेने चाकण एमआयडीसी निघोजे परिसरामध्ये वृक्षारोपण केले. (PCMC)
जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 250 हून अधिक नागरीकांनी या रक्तदान केले. याप्रसंगी चाकण एमआयडीसी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे कामगार नेते यशवंत भोसले यांची उपस्थिती लाभली. pcmc
त्याचबरोबर अभिजीत प्लास्टिकचे अभिजीत राऊत, प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अनिल भांगडीया, शिवसेना नेते योगेश बाबर, बांधकाम व्यवसायिक नामदेव पोटे, उद्योजक मनोज जरे, श्रीराम हंडीबाग, पोपट साठे आदी मान्यवर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. pcmc
या कार्यक्रमाला संघटनेचे संचालक दत्तात्रय दगडे यांनी संघटनेची माहीती या विषयावरती मनोगत व्यक्त केले. संघटनेचे सचिव निवास माने यांनी संघटनेच्या कामाचा आढावा घेतला.
उद्योजिका सुनीता गायकवाड यांनी कशाप्रकारे उद्योजकांबरोबर त्यांच्या पत्नी उद्योजिकांचा कसा ग्रुप तयार झाला व त्या याच्यापुढे ते कसं सामाजिक कार्य करणार आहेत या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. उद्योजिका महिला संघटनेच्या प्रमुख पौर्णिमा शिंदे, संघटना संचालक प्रवीण शिंदे यांनी संघटने विषयक आपले मनोगत व्यक्त केले. pcmc
त्यानंतर चाकण एमआयडीसी उद्योजक संघटनेचे संचालक प्रवीण शिंदे यांनी देखील संघटना व संघटनेचे अध्यक्ष यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले त्यानंतर अनिल भांगडीया व योगेश बाबर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सगळ्यात शेवटी जयदेव अक्कलकोटे यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.