Thursday, April 3, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : अजित गव्हाणे आमदार होणारच, काळ्या दगडावरील पांढरी रेष – विलास लांडे

ग्रामदैवत भैरवनाथ महाराज मंदिरात ग्रामस्थांची एकजुट (PCMC)

आढळररावांचे जे झाले त्याचीच पुनरावृत्ती होणार

नाथ साहेबांचा कौल, गावाला विकासाच्या वाटेवर नेणार


पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – चार महिन्यापूर्वी गावातील मंडळींनी भोसरी विधानसभेतील चित्र बदलले पाहिजे असा विचार मांडला. गेल्या दहा वर्षात भोसरी मतदारसंघात अत्यंत वाईट परिस्थिती उद्भवली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी परिवर्तन गरजेचे आहे. नाथ साहेबांनी कौल दिला असून परिवर्तन होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अजित गव्हाणे हे भोसरी विधानसभेचे आमदार होणार आहेत की काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे असा विश्वास माजी आमदार विलास लांडे यांनी व्यक्त केला. (PCMC)

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ (दि.4) भोसरीचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज मंदिरामध्ये झालेल्या बैठकीत माजी आमदार विलास लांडे बोलत होते. यावेळी शिवसेनेचे (उबाठा) रवी लांडगे, बाळासाहेब गव्हाणे, पंडित गवळी, योगेश गवळी आदीं उपस्थित होते.

विलास लांडे म्हणाले, भोसरीतील गेल्या दहा वर्षांत निर्माण झालेली परिस्थिती पाहून ग्रामस्थांनी चार महिन्यापूर्वी निर्णय घेतला. परिवर्तनाचा संघर्ष केला पाहिजे. या विचारावर ठाम राहून अजित गव्हाणे यांना तुम्ही परिवर्तनाची लढाई सुरू करा असे सांगितले. अजित गव्हाणे हे प्रामाणिक आणि सरळ आहेत.या मतदारसंघांमध्ये ग्रामस्थांनी लोकसभेला जे शिवाजीराव आढळराव पाटलांचे जे केले तेच समोरच्या उमेदवाराचे होणार आहे याची खात्री आम्ही ग्रामस्थांनी अजित गव्हाणे यांना दिली आहे. यापूर्वी कोणाला कोणी उभे केले हे समस्त भोसरी विधानसभा जाणते. आम्ही खांद्यावर घेतले मात्र समोरच्याने काय केले हे वेगळे सांगायची गरज नाही. अशा शब्दात विलास लांडे यांनी विरोधकांवर टीका केली. (PCMC)

रवी लांडगे यांनी माघार घेऊन मनाचा मोठेपणा दाखवला आहे. त्यांचा हा मोठेपणा भोसरी ग्रामस्थ कधीही विसरणार नाही. राजकारणाचा हा सुसंस्कृतपणा बाबासाहेब लांडगे यांच्यापासून चालत आला आहे. जो रवी लांडगे यांनीही जोपासला. लोकांच्या हिताच्या दृष्टीने राजकारणात काही गोष्टी कराव्या लागतात. असेही विलास लांडे यावेळी म्हणाले.

आपली रेष मोठी करायची

गेल्या दहा वर्षात अत्यंत वाईट परिस्थिती भोसरीने पाहिली आहे. म्हणूनच 20 नोव्हेंबर रोजी तुतारी समोरील बटन दाबून अजित गव्हाणे यांना भरघोस मतांनी विजयी करायचे आहे. असे आवाहन विलास लांडे यांनी यावेळी केले. लांडे म्हणाले काळजी करायचे काही कारण नाही.नाथ साहेबांच्या समोर सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचा शब्द दिला आहे. राज्यात भोसरीचे नाव आपल्याला मोठे करायचे आहे. रेष वाकडी किंवा बंद करून गावचा विकास आपल्याला बंद करायचा नाही.भविष्याची उंची गाठायची असेल तर आपली रेष मोठी करायची आहे असे देखील विलास लांडे यावेळी म्हणाले.

---Advertisement---
whatsapp link
google news gif

हेही वाचा :

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर

---Advertisement---

मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवर भोजपुरी गाण्यावर बाई नाचते;राज ठाकरे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर हल्लाबोल

रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालक पदावरून बदली; महाविकास आघाडीला मोठे यश

दिवाळीच्या फराळातून मतदारांना पैसे वाटप ; सांगलीत शरद पवार गटाचे उमेदवार अडचणीत

मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार

जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ

लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles