पिंपरी चिंचवड/क्रांतीकुमार कडुलकर: पत्राशेडलिंकरोड पुनर्वसन प्रकल्पामधील सदनिकांपासून वंचित राहिलेल्या झोपडीधारकांना त्यांचे हक्काचे घर मिळावे,यासाठी असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुंदर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली अ क्षेत्रिय कार्यालय भेळ चौक निगडी या ठिकाणी संवाद सभेद्वारे त्यांचे म्हणणे मांडण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुंदर कांबळे यांनी जे सदनिका पासून वंचित राहिलेले झोपडीधारक आहेत अशा झोपडीधारकांनाच सदनिकेचा लाभ द्यावा अशी मागणी यावेळी संवाद सभेद्वारे करण्यात आली.
यावेळी वंचित सदनिकाधारकांना माजी उपमहापौर हिराचंद उर्फ डबुशेठ आसवानी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व प्रत्येक सदनिका धारकांना न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन दिले याकरिता आपण लवकरच पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्तांची भेट घेणार असल्याचे म्हणाले